loader image
[ays_poll id=7]

नागापूरच्या शेतकऱ्याची मका तणनाशक फवरल्याने करपली

Jul 26, 2022

नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) : याबाबत अधिक वृत असे की नांदगाव तालुक्यातील नागापूर येथे श्री धर्मा पवार व सुभाष बोडके यांचे शेतात लागवड केलेल्या मका पिकावर बी ए एस एफ कंपनीचे टोप्रमिझोन हे तननाशक फवारणी केल्यामुळे मका पीक करपल्याचे आढळून आले. सदर तणनाशक शेतकऱ्यांनी मनमाड येथील आशीर्वाद कृषी केंद्रातून खरेदी केले होते. सदर तणनाशक फवारणी केल्यानंतर शेतातील सर्व मका पीक करपून गेल्याचे आढळून आले. शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधला असता उपविभागीय कृषी अधिकारी श्री दिलीप देवरे यांचे अध्यक्षतेखाली कृषी विज्ञान केंद्र वडेल येथील शास्त्रज्ञ रुपेश खेडकर, तालुका कृषी अधिकारी,नांदगाव जगदीश पाटील व पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुरेश चौधरी यांच्या उपस्थितीत बी ए एस एफ कंपनीचे प्रतिनिधी बाहेकर व कृषी सेवा केंद्राचे श्री चौधरी आणि शेतकरी यांचे उपस्थितीत मका पिकाची पाहणी करण्यात आली पिक १००% करपल्याचे निदर्शनास आल्याने तसा अहवाल शेतकऱ्यांना देण्यात आला. सदर पाहणी वेळी शेतकरी सल्ला समितीचे सदस्य श्री सुधाकर पवार,माजी जिल्हा परिषद सदस्य श्री राजेंद्र पवार, शेतकरी सल्ला समितीचे श्रीराम क्षीरसागर व शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांचे पिकाचे पूर्ण नुकसान झाले असल्याने कंपनीने सदर नुकसान भरून द्यावे अशी भावना श्री राजेंद्र पवार, श्री सुधाकर पवार व उपस्थीत शेतकऱ्यांनी कंपनी प्रतिनिधींना मांडली. बीएएसएफ कंपनीचे लॉट नंबर DTZ- 21014 या लॉटचे टोप्रामिझोन (टिंझर) या तणनाशकाच्या फवारणी केलेल्या नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील श्री.संदीप भीकनराव गरुड ,परधाडी येथील श्री.शांताराम जगण घोटेकर घोटेकर ,तांदुळवाडी येथील श्री.समाधान दिनकर काकळीज व नागापूर येथील श्री.धर्मा पांडुरंग सोमासे आणि श्री.सुभाष दामू बोडके या गावातील पाच शेतकऱ्यांकडे मका पीक करपल्याचा तक्रारी प्राप्त झाल्या असून या लॉटचे तणनाशक तपासणी साठी प्रयोगशाळेकडे पाठविले आहे. बी ए एस एफ कंपनीचे प्रतिनिधी यांनी सांगितले की सदर लॉट चे तणनाशक बाजारातून परत घेण्यात आले असून प्रयोग शाळेत तपासणी साठी पाठविण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी DTZ – 21014 या लॉटचे बी ए एस एफ कंपनीचे तननाशक फवारणीसाठी वापरू नये असे आवाहन समिती प्रमुख उपविभागीय कृषी अधिकारी माननीय दिलीप देवरे यांनी केले आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.