loader image
[ays_poll id=7]

संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ६७२ वा संजीवन समाधी सोहळा संपन्न

Jul 27, 2022


नांदगाव (प्रतिनिधी)श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ‘६७२’ वा संजीवन समाधी सोहळा उत्सव श्री क्षत्रिय अहीर शिंपी समाज नांदगाव यांच्यावतीने विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात पार पडला.समाजाध्यक्ष पंकज सोनवणे यांनी सपत्नीक सत्यनारायण पूजन केले.विद्यार्थी मनोगतामध्ये श्रावणी बोरसे या विद्यार्थीनीने संत नामदेवांच्या जीवनचरित्राबद्दल भाषण केले तर दिशा सोनवणे या चिमुकलीने अभंग रचना सादर केला

.जायंटग्रुपचे सर्वेसर्वा जगन्नाथ साळुंके सरांनी संत नामदेवांचा जीवनपट उपस्थित समाजबांधवाना उलगडून सांगितला.भागवत धर्माचा प्रचार व प्रसार संपूर्ण हिंदूस्थानात करणारे नामदेव महाराज हेच खरे वारकरी सांप्रदायाचे आद्य प्रवर्तक असल्याचे त्यांनी नमूद केले.समाज अध्यक्ष पंकज सोनवणे सरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सामाजिक विचारांची ,परंपरेची व नाविन्यपूर्ण उपक्रमांची जोड देवून बदल घडविण्याची अपेक्षा व्यक्त केली.गुणवंत विद्यार्थ्यांचा समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला.अध्यक्ष पंकज सोनवणे सर यांच्या मार्फत उपस्थित विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. बाबा अमरनाथ यात्रा सुखरुप पार करुन आलेले ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त शिक्षक अशोक निकुंभ सर यांचा सपत्नीक सत्कार समाजाच्या वतीने करण्यात आला.सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाज कार्यकारणीतील ज्येष्ठ मार्गदर्शक रमाकांतदादा सोनवणे, रघुनाथदादा तरटे ,रविंद्र खैरनार,सुनिल निकुंभ ,सुहास पुणतांबेकर ,आबा सोनवणे ,वसंत सोनवणे,पंकज सोनवणे,गणेश बागुल ,विनोद सोनवणे,सोमनाथ सोनवणे , अमित सोनवणे आदींचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश बागुल यांनी केले तर आभारप्रदर्शन पंकज सोनवणे यांनी केले


अजून बातम्या वाचा..

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.