Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आता नाशिक मधील रस्ते-परिसर दिसणार ३६०° अंशात ; गुगल स्ट्रीट व्हीव नवीन फिचरने वाढणार रंगत

Jul 28, 2022

गूगल (Google) नवी फीचर आणार अशी चर्चा होती. अखेर या चर्चेला आता पूर्णविराम लागला आहे. गूगल मॅप्सने अखेर गूगल स्ट्रीट व्ह्यू फीचर भारतातही लॉन्च केले आहे. हे फिचर वर्षाअखेरपर्यंत देशातील 50 शहरांमध्ये सुरु करण्याची गूगलची योजना आहे. आता हे मुंबई, पुणे, आणि नाशिक शहरात सुरु करण्यात आले आहे.

काय आहे गूगल स्ट्रीट व्ह्यू फीचर

आपण गूगलचा (Google) आधार घेत रस्ते आणि मार्ग शोधत असतो. गाडी चालवताना याचा खूप लाभ होतो. Google स्ट्रीट व्ह्यूव हे एक अद्यावत तंत्रज्ञान आहे. Google नकाशे आणि Google Earth अ‍ॅपद्वारे जगातील अनेक रस्त्यांवरील स्थानांवरुन परस्पर पॅनोरामा प्रदान करण्यास मदत करते. सर्वात आधी 2007 मध्ये अनेक यूएसमधील शहरांमध्ये लॉन्च करण्यात आले होते. त्यानंतर आता जगभरातील शहरे आणि ग्रामीण भागांचा समावेश करण्यासाठी त्याचा विस्तार केला जात आहे.

कंपनीने 15 वर्षांपूर्वी अमेरिकेत हे फिचर लॉन्च केले होते. या फिचरमुळे वापरकर्त्यांना अधिक चांगल्या प्रकारे या सुविधेचा आनंद घर बसल्या घेता येणार आहे. ज्या रस्त्यांचे फोटो Google Maps मध्ये उपलब्ध आहेत ते निळ्या रेषेत दाखवण्यात आले आहेत. यामध्ये रस्त्यांव्यतिरिक्त, या ठिकाणी जागतिक लँडमार्क, संग्रहालये तसेच रेस्टॉरंट्स देखील पाहण्यासाठी तुम्ही गूगल मॅप्समधील स्ट्रीट व्ह्यू फीचरचा वापर करु शकता.

गूगल स्ट्रीट व्ह्यू फीचर सध्या देशातील 10 शहरांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार असून, प्रायोगिक तत्त्वावर याची पहिल्यांदा सुरुवात बंगळुरु येथे सुरु केले जाणार आहे. त्यानंतर दिल्ली, मुंबई, पुणे, नाशिक, वडोदरा, अहमदाबाद, चेन्नई, हैदराबाद आणि अमृतसर या शहरांमध्ये याची सुरुवात केली जाणार आहे. या दहा शहरांमध्ये सुमारे 1,50,000 किलोमीटरचा परीसराचा समावेश करण्यात आलाय.

डाउनलोड गुगल स्ट्रीट व्हीव (Google Streat View)

https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.street

अजून बातम्या वाचा..

महानगरपालिका, नगरपरीषदांमधील नगरसेवकांची संख्या १७ टक्के वाढणार : मंत्री मंडळाची मंजुरी

ठिणगी पोर्टलने राज्यातील महानगरपालिका व नगरपालिकेत १५ टक्के नगरसेवक वाढणार या आशयाची बातमी...

read more

वीजबिल रोखीने भरण्यासाठी आता दरमहा पाच हजार रुपयांची मर्यादा, विनामर्यादा वीजबिल भरण्यासाठी ‘ऑनलाईन’ सेवा उपलब्ध!

  महावितरणच्या सर्व वर्गवारीतील ग्राहकांना येत्या सोमवार, दि. १ नोव्हेंबरपासून वीजबिल रोखीने...

read more

सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये व औद्योगिक आस्थापनांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक !

करोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात येत असल्याने अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. अर्थचक्राला...

read more

सिमेंटच्या जंगलात पक्ष्यांचा किलबिलाट वाढणार, नाशिकमध्ये पहिल्या पक्षी घराचे उद्घाटन !

दिवसेंदिवस मोठ्या शहरात सिमेंटची जंगले वाढत असताना पक्षांचा आवाज कमी कमी होत जात आहे, यातच नाशिक...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]