महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलेआहे. त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचा अपमान केला आहे असे म्हणत विरोधकांनी त्यांच्यावर सवाल उपस्थित केले आहेत. “गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही..!!” असं वक्तव्य भगसिंह कोश्यारींनी केले आहे. काल मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपालांचे हे वक्तव्य म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे, त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी सर्वच विरोधी पक्षांनी केली आहे. दरम्यान राज्यपाल यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार करून काय मागणी करतात हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.
साईराज परदेशी ने पटकावले कांस्यपदक
डेहराडून उत्तराखंड येथे सुरू असलेल्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत साईराज राजेश परदेशी ने...








