मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलचे पर्यवेक्षक अनिल मुरलीधर निकाळे सर यांना, त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल, मनमाडच्या फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे 2025 चा’ कुळवाडी भूषण ‘पुरस्काराने
शिव व्याख्याते मा.सुभान शेख यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.सन्मानपत्र, सन्मान चिन्ह व शाल असे या पुरस्काराचे स्वरूप होते. तालुका जिल्हा व विभाग स्तरावर गेल्या अनेक वर्षापासून इंग्रजी विषयाचे रिसोर्स पर्सन तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या निकाळे सरांनी शाळेतील अनेक गरजू विद्यार्थ्यांना कोणताही गाजावाजा न करता मदतीचा हात दिला आहे – देत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन यापूर्वीच महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना धुळे यांच्यातर्फे त्यांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. निकाळे सर राज्य मानव अधिकारी समितीचे (नांदगाव तालुक्याचे )माजी अध्यक्ष असून सध्या ते रोटरी क्लबचे क्रियाशील सदस्य आहेत. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम माननीय उप- मुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्स्ना, इंग्लिश मीडियमचे मॅनेजर फादर लॉईड,फादर विवेक तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.