loader image
[ays_poll id=7]

करंजवण मनमाड पाणीपुरवठा योजना ; लोकवर्गणी ची रक्कम शासन भरणार : मुख्यमंत्री शिंदे

Jul 31, 2022

नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला संबोधित करताना आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी मनमाड व नांदगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणीप्रश्नाबाबत महत्वपूर्ण घोषणा केल्या. याप्रसंगी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की नगरविकास खात्याचा मंत्री असताना दिलेल्या ३१७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे माननीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मनमाड – करंजवण पाणीपुरवठा योजना असे नामकरण करण्यात येणार आहे.

७८ खेडी पाणीपुरवठा योजनेसाठी २७२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून या योजनेला धर्मवीर आनंद दिघे योजना असे नाव देण्याचे निश्चित करण्यात आल्याची घोषणा त्यांनी याप्रसंगी केली.

दहीवड २६ गाव योजनेला २२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून ती देखील लवकरच कार्यान्वित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी दिले.

शिवसृष्टीच्या उभारणीसाठी २ एकर जागा मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला असून हा निर्णय याप्रसंगी जाहीर केला.

मनमाड नांदगाव नगरपरिषद हद्दीतील शाळा दुरुस्तीसाठी १० कोटींचा निधी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे असेही याप्रसंगी त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे, आमदार दादाजी भुसे, शिवसेना उपनेते आणि आमदार उदय सामंत, सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी शिंदे साहेबांचे भगवी शाल व चांदीची गदा देऊन आमदार सुहास अण्णा कांदे व सौ अंजूमताई कांदे यांनी जाहीर सत्कार केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार सुहास आण्णा कांदे यांचा सत्कार केला.
विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याप्रसंगी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.