loader image
[ays_poll id=7]

सावरगाव येथे “ऊर्जा महोत्सव” कार्यक्रम उत्साहात

Jul 31, 2022


येवला/नाशिक : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य “अंतर्गत पॉवर@२०४७” या ऊर्जा महोत्सवाचे केंद्र शासनाच्या ऊर्जा मंत्रालय व राज्य ऊर्जा विभागाच्या वतीने आयोजीत  राज्य आणि केंद्र सरकारमधील आणि ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाच्या कामगिरीवर प्रकाश टाकण्यासाठी आज रविवार ३१ जुलै रोजी येवला तालुक्यातील सावरगाव येथील श्री स्वामी समर्थ मठ येथील सभागृह, नाशिक येथे या महोत्सवाचा तीसरा व अंतिम   कार्यक्रम उत्साहात पार पडला. याप्रसंगी महावितरणच्या वतीने जिल्ह्यातील विद्युतीकरणाच्या विविध योजनांचा जागर विविध माध्यमांद्वारे या महोत्सवात करण्यात आला, यावेळी कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी वीज- ऊर्जा जीवनातील व प्रगतीतील महत्वपूर्ण घटक असल्याचे प्रतिपादन  केले. 


या महोत्सवात मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, आमदार नरेंद्र दराडे, अधिक्षक अभियंते ज्ञानदेव पडळकर, संजय खंडारे व रमेश सानप, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचे राजीव फरलिया, संभाजी पवार, बाळासाहेब लोखंडे, गटविकास अधिकारी अन्सार शेख,  आनंद शिंदे, प्रविण गायकवाड आणि सरपंच वैशाली काकड व्यासपीठावर उपस्थित होते.

आमदार नरेंद्र दराडे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की, ऊर्जा महोत्सवाचा कार्यक्रम सावरगाव या ऐतिहासिक गावामध्ये आयॊजीत केल्याबद्दल प्रशासनाचे आभार व्यक्त करीत ऊर्जा क्षेत्रातील विविध योजना निर्मिती व अंमलबजावणीमुळे  देशाला राज्याला व पर्यायाने गावांना लाभ होणार असून, ऊर्जा क्षेत्राला स्वयंपूर्ण करण्यासाठी अशा योजनांचा लाभ होणार असून त्यामुळे शेतकरी व ग्राहकांना सुद्धा चांगली सेवा मिळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी सांगितले की, स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांमध्ये ऊर्जाक्षेत्रात फार मोठ्याप्रमाणात बदल झाले असून विविध योजनांच्या माध्यमातून वीज यंत्रणा सक्षमीकरण व बळकटीकरण झाले आहे. २०४७ पर्यंत भारत देश ऊर्जा क्षेत्रामध्ये महासत्ता होणार असून त्यासाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजना आपल्या हिताचे असून त्याला सहकार्य करावे व सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. महावितरणच्या माध्यमातून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा व सुविधा आणखी गतीने व तत्पर देण्याचे ग्वाही त्यांनी यावेळी दिली.   

उज्वल भारत उज्ज्वल भविष्य – पॉवर @ २०४७ च्या छत्राखाली अधिक लोकसहभागासाठी आणि वीज क्षेत्रातील घडामोडींची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महोत्सव देशभरात साजरे केले जात असल्याची माहिती यावेळी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचे राजीव फरलिया यांनी दिली. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना.डॉ. भारतीताई पवार यांनी चित्रफितीद्वारे मार्गदर्शन केले. यावेळी बाळासाहेब लोखंडे यांनी सुद्धा संवाद साधला. कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्रीय ऊर्जा खात्याकडून करण्यात आलेल्या कामाची व योजनेची माहिती विविध चित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात आली. सौंदर्य निर्मिती फिल्म अँड थिएटर, नाशिक यांच्या वतीने दोन लघुनाटिका सादर करण्यात आल्या. यामध्ये विद्युत वितरण यंत्रणा सक्षमीकरण व ग्राहक अधिकार आणि कर्तव्य याची माहिती कलावंतानी नाटिकेमधून दिली.  प्रास्ताविक अधिक्षक अभियंता संजय खंडारे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाय्यक अभियंता सचिन बागुल यांनी केले तर अधिक्षक अभियंता रमेश सानप यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी महोत्सव यशस्वी करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला विविध योजनांचे लाभार्थी ग्राहक, लोकप्रतिनिधी, महापारेषण, महानिर्मिती व महावितरणचे कार्यकारी अभियंते, अभियंते, अधिकारी व कर्मचारी यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते. उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य अंतर्गत जिल्ह्यात तीन विविध ठिकाणी कार्यक्रम घेऊन संवाद साधण्यात आला. 


अजून बातम्या वाचा..

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
.