श्रावण सोमवार निमित्त 1008 बेलाच्या पानांचा वापर करून महादेवाची प्रतिमा येवल्यातील कलाकार संतोष राऊळ यांनी बेलाच्या पानांवर रंगांचा वापर करून साकारली असून महादेवाच्या मूर्तीच्या आजूबाजूला देखील बेलाचे पाने लावले असून या बेलांच्या पानावर देखील शिवशंभो ,महादेवाच्या विविध प्रतिमा,नावे देखील या कलाकाराने आपल्या हाताच्या साह्याने पेंट करून साकारली आहे.कलाकार आपली कलाकारी विविध माध्यमातून नेहमी साकारत असतो. अशाच प्रकारे येवल्यातील संतोष राऊळ या कलाकाराने श्रावण महिनाचे निमित्ताने 1008 बेलाचे पाने आणून ह्या सर्व बेलाच्या पानांना महादेवाचा आकार देऊन त्यावर कलर देऊन ध्यानस्थ महादेवाची अप्रतिम अशी प्रतिमा साकारली असून या मूर्तीच्या आजूबाजूला देखील शेकडो बेलाचे पाने लावून त्यावर देखील महादेवाच्या विविध प्रतिमा, ओम नमः शिवाय, डमरू, त्रिशूल असे सर्व महादेवाचे नावे व शस्त्र या कलाकाराने आपल्या हाताच्या साह्याने पानावर कलरच्या माध्यमातून रेखाटन करून साकारले आहे. याकरता या कलाकाराला दोन दिवसाचा कालावधी लागला आहे.
सुप्रसिद्ध पार्श्वगायक पद्मश्री मोहम्मद रफी यांच्या जयंतीनिमित्ताने एक अनोखी संगीत मैफील संपन्न.
– ओमकार संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केली बहारदार गीते....











