Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

(बघा व्हिडीओ) मनमाड शहरातील आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग खेळाडु आकांशा व्यवहारे आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांची भव्य स्वागत मिरवणुक

Aug 4, 2022

मनमाड : (योगेश म्हस्के) येथील युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी मनमाड च्या जयभवानी व्यायाम शाळेतील महाराष्ट्रातील पहिली आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती शेखर पाराशर व जागतिक युथ स्पर्धेतील रौप्यपदक विजेती श्री गुरू गोविंद सिंग हायस्कुलची विद्यार्थिनी आकांक्षा किशोर व्यवहारे यांची भारतीय संघात निवड होऊन रौप्यपदक,कांस्यपदक पटकावले ,


मनमाड सारख्या छोट्या शहरातून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रशिक्षक तृप्ती व आकांक्षा ने नाशिक जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राचा नावलौकिक वाढविला असल्याने यांची शहरातील एकात्मता चौकातून स्वागत मिरवणुक काढत डॉ बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या वेळी मिरवणुक मार्गावर ठिक-ठिकाणी या खेळाडूंचा मनमाड शहर पत्रकार संघ , संस्कृती संवर्धन समिती ,पेडल फॉर हेल्थ सायकलिंग ग्रुप ,शहरातील राजकिय पक्ष , सामाजिक संघटना , संस्था आणि नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. मिरवणूक जयभवानी व्यायाम शाळेपर्यंत काढण्यात आली. या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, यावेळी नांदगाव नगरपालिकेचे मा.नगराध्यक्ष राजेश कवडे ,


जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील , मोहन गायकवाड , उमाकांत राय , सुभाष नहार , सुनील हांडगे , पत्रकार अमोल खरे , स संदिप देशपांडे , सादिक तांबोळी, कैलास बेदमुथा , पोपट बेदमुथा , रमाकांत मंत्री , शेखर पराशर , प्रशिक्षक प्रविण व्यवहारे , अशोक व्यवहारे, किशोर व्यवहारे यांची मंचावर उपस्थिती होती,नितीन पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थ्यांनींना सुरक्षितेसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थ्यांनींना सुरक्षितेसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

  मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थीनींच्या स्वयं...

read more
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट महाविद्यालय व कार्यक्रम अधिकारी पुरस्कार मनमाड महाविद्यालयस जाहीर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट महाविद्यालय व कार्यक्रम अधिकारी पुरस्कार मनमाड महाविद्यालयस जाहीर

राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. पवनसिंग परदेशी यांना विद्यापीठस्तरीय सर्वोत्कृष्ट...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]