loader image
[ays_poll id=7]

आज पुन्हा सुनावणी : शिंदे विरुद्ध ठाकरे

Aug 4, 2022

एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे या सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या प्रकरणावर आज पुन्हा म्हणजेच सुनावणी होणार आहे. काल दोन्ही पक्षातील वकिलांनी विविध मुद्द्यांवर जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर आज सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. गुरुवारी सुप्रीम कोर्टाच्या पटलावर पहिलीच केस घेतली जाईल. कोर्टाचे कामकाज सकाळी 10.30 वाजता सुरु होतं. त्यामुळे उद्या सकाळपासून पुन्हा एकदा दोन्ही गटाचे वकील आपापल्या मुद्द्यांवर युक्तिवाद करतील. आज उद्धव ठाकरे यांच्या गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिंदे गटातील आमदारांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार, अपात्रतेची कारवाई झाली पाहिजे, यासाठी जोरदार युक्तिवाद केला. तर शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांनीदेखील आम्ही अजून पक्ष सोडला नसल्याने पक्षांतर बंदी कायदा आम्हाला लागूच होऊ शकत नाही, असा युक्तिवाद केला. त्यानंतर कोर्टानेही दोन्ही पक्षांच्या वकिलांसमोर काही प्रश्न उपस्थित केले

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड - शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 20 व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात...

read more
फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

  मनमाड:- आमदार मा.सुहास (आण्णा) कांदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना युवासेना...

read more
मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

श्री मंगेश दराडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती आज पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती...

read more
.