महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर कोणताही निर्णय न घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. मात्र, या प्रकरणी निवडणूक आयोग सुनावणी घेऊ शकतो. मात्र, निर्णय घेऊ शकत नाही असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले. तर, आमदारांच्या अपात्रतेसह इतर मुद्यांवर प्रलंबित असलेल्या याचिकेवरील सुनावणी आठ ऑगस्ट रोजी होणार आहे. हे प्रकरण घटनापीठाकडे पाठवायचे का, याचा निर्णयही सोमवारी होणार आहे.
फलक रेखाटनातून भावपूर्ण श्रद्धांजली…! ‘अर्थव्यवस्थेचा ‘सरदार’ हरपला..!’
जेष्ठ अर्थतज्ञ ,आर्थिक सुधारणेचे जनक,शांतपणाचे अ 'सरदार' नेतृत्व. माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग...








