loader image
[ays_poll id=7]

राष्ट्र सेवा दला,संविधान साक्षरता अभियानच्या वतीने पिंपळगांव बसवंत येथे हर घर संविधान व संविधान संवर्धक-प्रचारक कार्यशाळेचे आयोजन : शरद शेजवळ

Aug 4, 2022

रविवार दिनांक ७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११:४५ ते ३:३० वा. स्व.बी.पी.पाटील कॉलेज ऑफ सायन्स,(पिंपळगांव हायस्कुल) पिंपळगांव बसवंत,ता.निफाड. येथे नाशिक जिल्हा स्तरीय संविधान संवर्धक-प्रचारक कार्यशाळा व “हर घर संविधान” उपक्रम उदघाटन होणार असल्याची माहिती निमंत्रक शरद शेजवळ यांनी दिली आहे.
भारतीय संविधान निर्मिती पूर्व इतिहास-संविधान निर्माण प्रक्रिया,संविधान सभेची स्थापना,मसुदा समितीचे कार्य,भारतीय संविधानाची उद्देशिका,संविधानाने भारतीयांना काय दिले ?,भारतीय संविधान संवर्धन-प्रचारक होणे व “हर घर संविधान” घेऊन जाण्याची गरज,संविधान संवर्धन व प्रचार-प्रसार/ भारतीयांच्या जबाबदाऱ्या या बद्दल सदर कार्यशाळेत मार्गदर्शन होणार असून भारतीय संविधानाप्रति आपली बांधीलकी व हक्क अधिकाराबद्दल जाणीव जागृती अधिक दृढ करण्याकरता संविधान संवर्धक व हर घर संविधान उपक्रमात सहभागी होण्याकरता एक दिवसीय संविधान संवर्धक-प्रचारक कार्यशाळेत सहभागी व्हा असे आवाहन करण्यात आले आहे. सहभागा करता पुढील लिंकवर जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा लिंक
https://forms.gle/1fsaZ7fT6q3mqhHN8
सदर उपक्रमाचे
उदघाटन महाराष्ट्र राष्ट्र सेवादलाचे कार्याध्यक्ष प्रा.अर्जुन कोकाटे तर प्रमुख अतिथी म्हणून नाशिक राष्ट्र सेवादल जिल्हा प्रमुख दिनकर दाणे राहणार आहेत स्व.बी.पी.पाटील कॉलेज ऑफ सायन्स, पिंपळगांव बसवंत चे प्राचार्य दिनेश अनारसे अध्यक्षस्थानी आहेत.कार्यशाळेचे मुख्य मार्गदर्शक संविधान संवर्धक,संविधान साक्षरता-संवर्धन अभियानचे महेंद्र गायकवाड करतील अशी माहिती निमंत्रक संविधान संवर्धक,संविधान साक्षरता-संवर्धन अभियानचे शरद शेजवळ सर यांनी दिली आहे.सहभागी होण्यासाठी फोन संपर्क 9822645706

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.