loader image
[ays_poll id=7]

बोडवड तालुक्यात अधिकाऱ्याचे अंतर्वस्त्रावर लेखा परीक्षण : चौकशीचे आदेश

Aug 5, 2022

केवळ अंतर्वस्त्रावर लेखा परीक्षण अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत लेखापरीक्षण केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्हयात बोदवड तालुक्यात उघडकीस घडला आहे. या प्रकारामुळे जिल्हयात खळबळ उडाली आहे.

ग्रामपंचायतीचे लेखा परीक्षण चक्क चड्डी-बनियानवर
जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील एनगाव ग्रामपंचायतीचे चौदाव्या वित्त आयोगाचे लेखा परीक्षण करण्यासाठी दोन दिवस पूर्वी नाशिक येथील पथक जळगाव जिल्ह्यात गेले होते. या पथकाने एनगाव ग्रामपंचायतीचे लेखा परीक्षण गावातील एका खोलीत बसून चक्क चड्डी बनियानवर राहून ते केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात यामुळे खळबळ उडाली आहे.

सरपंच आणि ग्रामसेवकांनी लेखा परीक्षण अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी वेगळी राहण्याची व्यवस्था केल्याच्या चर्चा या निमित्ताने रंगल्या आहेत. या घटने संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार प्राप्त झाली असून त्या संदर्भात योग्य ती चौकशी कडून कारवाई केली जाणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, 14 वा वित्त आणि 15 वित्त आयोगाचे लेखीपरीक्षणासाठी नाशिकचे तीन अधिकारी बोदवड गावात एका घरात हे परिक्षण केल्याची माहिती मिळत आहे. मात्र त्यांनी केवळ अंतर्वस्त्रावर लेखीपरीक्षण केल्याने आर्श्चय व्यक्त केले जात असून हा विषय सध्या चर्चेचा ठरत आहे. या अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने लेखी परिक्षण नेमके का केले? असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. याचे कारण मात्र अद्यापही समजले नाही.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.