loader image
[ays_poll id=7]

पवित्र श्रावण महिन्यानिमित्ताने निसर्गरम्य आणि प्राचीन वरदडी येथील शनिमंदिर येथे भाविकांची गर्दी….

Aug 6, 2022

मनमाड (योगेश म्हस्के): चांदवड तालुक्यातील उसवाड वरदडी येथील निसर्गाने नटलेले अतिप्राचीन श्री शनिमंदिर , येथे दरवर्षी श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी आणि शनी आमवस्येच्या दिवशी भविकांची दर्शनाला मोठी गर्दि होत असते , या ठिकाणाला विशेष असे महत्व आणि तितकाच प्राचीन असा इतिहास देखील आहे.

उज्जैन येथील राजा विक्रम यांच्यावर जेव्हा शनी महाराजांचा कोप झाला तेव्हा त्यांनी साडेसात वर्ष वरदडी येथील परिसरामध्येच सहवास केला होता. राजा विक्रम एके दिवशी घोडा खरेदी करण्यासाठी घोडे बाजारात गेले असता तेथे शनी महाराज देखील आपले रूप बदलून घोडे विक्रीसाठी आले होते जेव्हा राजांनी शनी देवांकडील घोडा पसंद करून घेण्याचे ठरवले तेव्हा शनी देवांनी त्यांना घोडा चालवून पाहण्यास सांगितला जेव्हा विक्रम राजा घोडा चालवण्यासाठी घोड्यावर स्वार झाल्यावर उज्जैन वरून घोड्याने उड्डाण करून संध्याकाळी घोड्याने राजास वरदडी येथील घनदाट जंगलात आणून सोडले , आज देखील घोडा जेथे उतरला ती जागा वरदडी येथे बघु शकतो .राजा विक्रम यांनी आपल्या साडेसातीचा काळ वरदडी येथील परिसरात पूर्ण केल्या वर शनी महाराज प्रसन्न होऊन त्यांनी राजा विक्रमास संगितले की या जागेवर येऊन जो कोणी मनुष्य शरण येईल त्याचा साडेसातीचा प्रकोप कमी होईल आणि त्यांना शनी देव प्रसन्न होतील.

या ठिकाणी शनी देवांच्या सोबतच राहू आणि केतू या दोन ग्रहांची देखील मंदिरामध्ये मुर्ती आहे. येथील परिसर धार्मिक महत्वा बरोबरच डोंगर, झाडे आणि पावसाळ्यात छोटे झरे वाहत असल्याने खुपच सुंदर देखील आहे , श्री शनी मंदिर येथे एक छोटासा धबधबा वाहत असुन भाविक आणि पर्यटक येथे याचा आनंद घेण्यासाठी गर्दी करत आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.