loader image
[ays_poll id=7]

उद्या होणार मंत्रीमंडळ विस्तार ; आमदार सुहास कांदेंची लागणार वर्णी ?

Aug 8, 2022

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर शिंदे सरकारला मुहूर्त सापडला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी नंदनवन येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यात काही तास चर्चा झाली. ही चर्चा मंत्रिमंडळ विस्ताराबाबत होती. त्यानंतर आता उद्या सकाळी 11 वाजता काही मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण 18 मंत्री शपथ घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाचे 9 आणि भाजपचे 9 मंत्री शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यसह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे.

कोणत्या आमदारांची लागेल मंत्रीपदी वर्णी?

शिंदे सरकाराच्या या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातून सुहास कांदे, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, उदय सामंत, अब्दुल सत्तार, शंभुराजे देसाई, राजेंद्र यड्राव्हकर, संजय राठोड यांची यांची मंत्रीपदी वर्णी लागू शकते. यात अब्दुल सत्तार यांच्या नावाचीही चर्चा आहे. मात्र टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तारांच्या मुलींचे नाव समोर आल्यानंतर त्यांची मंत्रीपदी वर्णी लागणार की, नाही हे अद्याप गुलदस्त्यात आहे. तर भाजपकडून चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, प्रवीण दरेकर यांच्यसह काही नवीन चेहऱ्यांना भाजप संधी देऊ शकते

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.