loader image
[ays_poll id=7]

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे “मातृत्व” कार्यशाळेचे आयोजन

Aug 12, 2022

नाशिक : गरोदर माता आणि त्यांच्या जोडीदाराच्या मनातील शंका आणि प्रश्न विचारात घेऊन उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रथमच मोठ्या स्तरावर गरोदर मातांसाठी या कार्यशाळेचे आयोजन अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल , नाशिक यांच्या तर्फे करण्यात आले आहे. शनिवार, दिनांक २० ऑगस्ट रोजी दुपारी ४:०० वाजता अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, इंदिरानगर , वडाळा रोड ,नाशिक येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे . सुरक्षित मातृत्व हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेऊन या कार्यक्रमाला “मातृत्व” असे नाव देण्यात आले आहे. ज्या मध्ये गरोदर स्त्रिया आणि त्यांच्या जोडीदाराला तज्ज्ञांशी प्रत्यक्ष संवाद साधता येणार आहे. 
        या कार्यक्रमात गर्भधारणापूर्व समुपदेशन, प्रसूती पूर्व चाचणी , सुखरूप प्रसूती , नवजात शिशु चे संगोपन , पोषण व आहार , व्यायाम , गर्भसंस्कार , प्रसूती पश्चात काळजी , अशा विविध विषयावर तज्ञ् डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत.  स्रीरोग व प्रसूतीशास्र तज्ञ् डॉ मनोज पापरिकर  , डॉ श्रीकला काकतकर , डॉ प्रणिता संघवी , डॉ कुणाल आहिरे , नवजात शिशु व बालरोग तज्ञ् डॉ सुशील पारख ,फिजोथेरीपिस्ट डॉ रोहन देव ,पोषण व आहार तज्ञ् साक्षी भाबांरे , गर्भसंस्कार प्रशिक्षिका डॉ वैदेही देवधर. हि सर्व तज्ञ् मंडळी उपस्थित असणार आहेत आणि उपस्थित समुदायाचे सखोल मार्गदर्शन करणार आहेत.  
          मातृत्व या कार्यशाळेस उपस्थित राहण्यासाठी पूर्व नाव नोंदणी सुरु असून मर्यादित जागा उपलबध आहेत. प्रति जोडपे रु 99 /- नाममात्र भरून कार्यशाळेसाठी पूर्व नोंदणी करण्यात येऊ शकते. यासाठी 8956196160 या क्रमांकावर फोन करून अधिक माहिती घेता येऊ शकते . कार्यक्रमानंतर अल्पोहार ची व्यवस्था  गरोदर मातासाठी करण्यात आली आहे. तरी या कार्यशाळेला उपस्थित राहून जास्तीत जास्त सर्वांनी लाभ घ्यावा. असे आव्हान अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल यांच्या वतीने करण्यात आले आहे

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
.