loader image

अखंड भारत दिनानिमित्त भाजपा तर्फे रक्तदान शिबिर संपन्न

Aug 15, 2022


मनमाड – भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सव दिनाच्या निमित्ताने (१४ अखंड भारत दिनी ) मनमाड शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सन २००५ पासून यंदा सलग १८ व्या वर्षी स्वातंत्र्ययुध्दात शहीद झालेल्या स्वातंत्र्यवीरांना तसेच देशासाठी प्राण अर्पण करणार्‍या शहीद सैनिकांना रक्तदानाने आदरांजली वाहण्यात आली. या रक्तदान शिबीराच्या कार्यक्रमाचा शुभारंभ रक्तदाते व भाजपा मनमाड शहराध्यक्ष जयकुमार फुलवाणी, भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष सचिन दराडे ,आर्थिक सेल जिल्हा अध्यक्ष कांतीलाल लुणावत आदी मान्यवरांच्या हस्ते भारत माता पूजन व दिपप्रज्वलन करुन करण्यात आला. शिबीर संयोजक भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी गत १८ वर्षापासून अखंड भारतदिनाचे स्मरण व्हावे म्हणून सर्व ऐच्छिक रक्तदात्यांच्या सहकार्याने हा रक्तदानाचा यज्ञ सुरु ठेवला आहे कोरोना संकट काळात भाजपा मनमाड तर्फे कोविड रुग्णांना रक्ता संबंधित भरीव मदत झाली असल्याचे याप्रसंगी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भाजपा मनमाड शहर संघटन सरचिटणीस नितीन परदेशी यांनी केले. भाजपतर्फे २००५ पासून सलग या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते. एकच तारीख, एकच ठिकाण, एकच संयोजक व एकच रक्तपेढी असे सलग १८ वर्ष (दीड तप) होण्याचा हा विक्रम या रक्तदान शिबीराच्या संयोजनाने मनमाड भाजपने केला आहे. गेल्या १८ वर्षात सुमारे ८५० पेक्षा जास्त रक्तदात्यांनी या शिबीरात सहभाग नोंदवला आहे. यंदाही ४२ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून स्वातंत्र्यवीरांना या रक्तदान शिबीरात रक्तदानाने श्रध्दांजली वाहिली. या रक्तदान शिबीराच्या कार्यक्रमास , भाजप जिल्हा उपाध्यक्ष पंकज खताळ, भाजपा माथाडी कामगार नासिक जिल्हा अध्यक्ष नारायण पवार,भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा सरचिटणीस सचिन लुणावत , व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सचिन संघवी जेष्ठ भाजपा नेते उमाकांत राय निळकंठ त्रिभूवन, महेंद्र गायकवाड शहर सरचिटणीस एकनाथ बोडखे,नितीन अहिरराव अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष जलील अन्सारी ,भाजपा शहर कोषाध्यक्ष आनंद काकडे ,शहर उपाध्यक्ष संदीप नरवडे, मकरंद कुलकर्णी, गौरव ढोले, केतन देवरे गोविंद सानप, ॲड, राजेंद्र पालवे,अकबर शहा बुधण बाबा शेख,,धीरज भाबड, हरदिप सिंग चावला, मुकेश पाटील दिव्यांग सेल चे जिल्हा उपाध्यक्ष बुर्‍हान शेख,भाजपा दीव्यांग आघाडी शहर अध्यक्ष दीपक पगारे, शंकर सानप मनोज जंगम, , सचिन हिरालाल लूनवात,सुमेर मिसर, मुर्तुझा रस्सीवाला शिवसेना जिल्हा उप प्रमुख संतोष बळीद,ओम मित्र मंडळाचे किशोर गुजराथी ,आनंद सेवा केंद्राचे प्रमुख कल्पेश बेदमुथा, राष्ट्रीय स्वयसेवक संघाचे अनंता भामरे, चेतन गंगेले, स्वप्नील मोहरीर अक्षय सानप,,राहुल लांबोळे योगेश म्हस्के दीपक शिंदे ,यश स्वर्गे, हरदिपसिंग चावला रॉकी फुलवाणी , कृष्णा स्वर्गे अमोल औटी,राकेश पितृभक्त, संतोष भराडे अशोक अहिरे, आनंद गंगेले हेमंत शेटे, संजय पठाडे आदीं मान्यवरा सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व रक्तदाते याप्रसंगी उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते यंदा भारतीय स्वातंत्र्य च्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने तिरंगा व गौरव प्रमाणपत्र देवून रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला. नाशिक येथील जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने डॉ.संजय कुलकर्णी ,अशोक कुळकर्णी यांनी रक्तसंकलन केले. शिबीराचे संयोजन जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी केले तर भाजपा मनमाड शहराध्यक्ष जयकुमार फुलवाणी नितीन परदेशी , जलिल अन्सारी यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार व्यक्त केले.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
.