loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहर आणि नांदगाव तालुकामराठी पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिन साजरा

Aug 16, 2022


मनमाड ता १६ : स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणाची आहूती देऊन शहिद झालेले आणि १९४२ च्या लढ्यात आपल्या घरा-दारावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्याच्या लढ्यात आपल्या जीवाची तमा न बाळगता केवळ देशासाठी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याचे स्मरण ठेवून त्यांच्या पाल्यांचा गौरव तथा कृतज्ञता सन्मान सोहळा आणि देशभक्तीपर समुह गीतगायन स्पर्धा संपन्न झाली. वंदे मातरम् आणि भारतमाता की जयच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला .

मनमाड शहर आणि नांदगाव तालुकामराठी पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनी येथील लोकमान्य सभागृहात स्वातंत्र्यलढ्यांतील स्वातंत्र्यसैनिकांच्या परिवारातील सदस्यांचा कृतज्ञता सन्मान सोहळा आणि शहर पातळीवरील शाळा- विद्यालयांसाठी देशभक्तीपर समुह गायन स्पर्धा असा आगळा वेगळा उपक्रम उत्साहात संपन्न झाला . समूह गायन स्पर्धेत शहरातील १३ शाळा – महाविद्यालयाचे संघ सहभागी झाले होते. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते संजय वाघ, पत्रकार संघ तालुका समन्वयक अमोल खरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश शेळके, ज्येष्ठ पत्रकार नरेश गुजराथी, सोमनाथ घोंगाणे , संजय मोरे , नरहरी उंबरे, जगन पाटील आदी उपस्थित होते . समन्वयक अमोल खरे यांनी प्रास्ताविकात मराठी पत्रकार संघाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला . साहित्य अकादमी पुरस्कारार्थी संजय वाघ यांनी साहित्यासह मनमाड पत्रकार संघाने राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत करून पत्रकार संघाने यासारखे विधायक उपक्रम अव्याहत सुरू ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त केली . स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांतर्फे राजेंद्र पारीक , विजय नाईक , कांतीलाल येणारे यांनी मनोगत व्यक्त करतांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात शासन आणि प्रशासनाने स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याकडे दुर्लक्ष केले मात्र लोकशाहीचा चौथास्तंभ असलेल्या पत्रकार संघाने त्यांची जाणिव ठेवली आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांचा कृतज्ञता सन्मान केला . याबद्दल आभार मानले . यावेळी आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक खेळाडू सैफ तांबोळी , आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग खेळाडू आकांक्षा व्यवहारे , आंतरराष्ट्रीय कुस्ती खेळाडू शुभम आचपळे , राज्यस्तरीय चैंपलिंग खेळाडू हर्षाली मिस्कर , वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे , तृप्ती पाराशर यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन उपाली परदेशी, आनंद बोथरा यांनी केले . अशोक बिदरी यांनी आभार मानले . समुह देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे परिक्षण विनोद आहिरे, सुरेंद्र भुजंग, आम्रपाली पाटील यांनी केले पत्रकार सतिश शेकदार , निलेश वाघ , अनिल आव्हाड , तुषार गोयल , संदीप जेजूरकर , प्रमित आहेर , योगेश म्हस्के , निलेश व्यवहारे , बाबासाहेब बोरसे , रामदास सोनवणे , गणेश केदारे , राजू लहिरे , योगेश देशपांडे , रूपाली आहिरे आदींनी संयोजन केले .

कै. रामेश्वर पारीक , कै. कृष्णाजी नाईक , कै. रामचंद्र हरकल , कै. चिमणराव धात्रक , कै. गणपतराव येणारे , कै. भागुजी गवळी , कै. यादवराव रसाळ , कै. फुलचंद बोगावत , कै. रंगनाथ कासार , कै. विठ्ठलराव नाईक, कै. बाबुराव देवळे , कै. तुकाराम शिंदे , कै. त्रिभुवनदास पालिवाल , कै. रोडूजी गवळी , कै. गोपाळराव देवळे स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला .


अजून बातम्या वाचा..

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.