Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

“मातृत्व” कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Aug 24, 2022

नाशिक : अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे “मातृत्व” कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत ३० दाम्पत्यांनी हजेरी लावली होती गरोदर माता आणि त्यांच्या जोडीदाराच्या मनातील शंका आणि प्रश्न विचारात घेऊन उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रथमच मोठ्या स्तरावर गरोदर मातांसाठी ‘सुरक्षित मातृत्व’ हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेऊन या कार्यक्रमाला “मातृत्व” असे नाव देण्यात आले होते या कार्यशाळेत गरोदर स्त्रिया आणि त्यांच्या जोडीदारांनी तज्ज्ञांशी प्रत्यक्ष संवाद साधला.
डॉ सुशील पारख हे उपस्थित जोडप्याचे मार्गदर्शन करताना म्हणाले कि, गर्भधारणापूर्व समुपदेशन , प्रसूती पूर्व चाचणी, सुखरूप प्रसूती , पोषण व आहार , व्यायाम , नवजात शिशु चे संगोपन ,व प्रसूती पश्चात घेण्यात येणारी काळजी , या सर्व सुविधा जर एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यास माता व नवजात शिशु यांच्यावर योग्य उपचार करण्यास सोईचे जाते , याच प्रमाणे जर प्रसूती पूर्व चाचणी मध्ये गरोदर मातेस उच्च रक्तदाब किंवा इतर व्याधी असल्यास त्याचे योग्य निदान करून सुखरूप प्रसूती करता येते , मुदतीपूर्व प्रसूती झाल्यास नवजात शिशू ला ICU ची गरज पडल्यास बाळाला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी जो महत्वाचा वेळ वाया जाऊन बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. जर या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यास माता आणि नवजात शिशु यांच्या आरोग्याचे संभाव्ये धोके टाळता येऊ शकतात.
या कार्यशाळेत स्रीरोग व प्रसूतीशास्र तज्ञ् डॉ मनोज पापरिकर , डॉ श्रीकला काकतकर , डॉ प्रणिता संघवी , डॉ उझ्मा शेख , डॉ कुणाल आहिरे , नवजात शिशु व बालरोग तज्ञ् डॉ सुशील पारख ,फिजोथेरीपिस्ट डॉ रोहन देव ,पोषण व आहार तज्ञ् साक्षी भाबांरे , गर्भसंस्कार प्रशिक्षिका डॉ वैदेही देवधर.यांनी सुरक्षित मातृत्व यावर सखोल मार्गदर्शन करून विशेष दाद मिळवली. “मातृत्व” कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी आशिष सिंग , आशना नायडू , राधिका मेहरुलिया , विश्वानंद साळवे आणि विपणन विभाग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

अजून बातम्या वाचा..

जि.प.प्राथमिक शाळा साकोरे येथे तालुकास्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

जि.प.प्राथमिक शाळा साकोरे येथे तालुकास्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

नांदगांव : मारुती जगधने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकोरे येथे तालुकास्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष...

read more
मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून….येवला तालुक्यातील गारपीटग्रस्त ३७७ बाधित शेतकऱ्यांना ७८ लाख ७७ हजार रुपये निधी वितरित

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून….येवला तालुक्यातील गारपीटग्रस्त ३७७ बाधित शेतकऱ्यांना ७८ लाख ७७ हजार रुपये निधी वितरित

नाशिक,येवला,दि.१३ जानेवारी :- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ...

read more
बघा व्हिडिओ – पुणे येथे संपन्न झालेल्या  मनसेच्या मार्गदर्शन मेळाव्याला चांदवड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

बघा व्हिडिओ – पुणे येथे संपन्न झालेल्या मनसेच्या मार्गदर्शन मेळाव्याला चांदवड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजस ठाकरे यांनी पुणे येथे श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सर्व...

read more
रामतीर्थ आणि काळाराम मंदिराला भेट देणारे मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान:- डॉ.भारती पवार

रामतीर्थ आणि काळाराम मंदिराला भेट देणारे मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान:- डॉ.भारती पवार

प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या २७ व्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]