loader image

एफ सी आय रोडवरील मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Jan 13, 2024


संपूर्ण देशवासी आतूरतेने ज्या क्षणाची वाट पाहत आहे त्या रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमीत्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.त्याला अनुसरूनच एफ. सी. आय रोड परिसरातील श्री शिद्धीविनायक मंदिर, श्री हनुमान मंदिर आणि संतोषी माता मंदिर यांच्या विद्यमाने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन १४ जाने ते २२ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. यात शहरातील विविध भजनी मंडळ वेदिका महिला मंडळ, सिधीविनायक महिला मैडळ, गुजराथी महिला मंडळ, विठ्ठल मंदिर महिला मंडळ, दत्तोपासक भजनी मंडळ आदींचे भजन ठेवण्यात आले आहे तसेच १६ जाने २४ मंगळवार रोजी सुंदरकांड पाठ होणार आहे. व २० जाने २४ला हनुमान मंदिर भक्त मंडळ तर्फे भजन संध्याचे आयोजन करण्यात आले आहे.

२२ जाने. रोजी प्रभुरामचंद्रांची पालखी सिद्धिविनायक मंदिर येथून सुरू होऊन हनुमान मंदिर येथे समारोप होईल. दुपारी १२ वाजता हनुमान मंदिरात महाआरती होऊन नंतर महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे. तर दि. १४ जाने ते दि. २२ जाने. या काळात एफ. सी. आय रोड. येथील मंदिर तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून समस्त नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून आनंद साजरा करावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.