Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सर्जा-राजाचा “बैलपोळा” सण उत्साहात साजरा

Aug 26, 2022

मनमाड (योगेश म्हस्के) : श्रावण महिन्याची सुरुवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावास्या येते आणि संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो सर्जा-राजाचा सण म्हणजे ‘पोळा.’

या दिवशी, बैलांचा थाट असतो. या दिवशी त्यांना कामापासून आराम असतो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते. पोळ्याला त्यांना नदी, ओढय़ात नेऊन धुण्यात येते. या दिवशी त्यांच्या पाठीवर सुरेख नक्षीकाम केलेली झूल , सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगुरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा, पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे,
आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजश्रुंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात.सायंकाळी गावाच्या सीमेजवळ एक मोठे आंब्याच्या पानाचे तोरण करून बांधतात. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. यांच्यातर्फे तोरण तोडले जाते व पोळा ‘फुटतो’. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेण्यात येतात.

मनमाड शहर आणि परिसरात देखील पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला , शहरातील बुधलवाडी , दरगुडे वस्ती , वेशीतील मारुती मंदिर येथे शेतकरी बंधवांकडून आपल्या सर्जा -राजाला सजवुन , मारुती मंदिरासमोर मानवंदना देऊन वाजत गाजत पोळा सण साजरा केला करण्यात आला.

अजून बातम्या वाचा..

आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नाने २९ कुटुंबीयांना आर्थिक सहायता निधी प्रदान!

आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नाने २९ कुटुंबीयांना आर्थिक सहायता निधी प्रदान!

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नाने नांदगाव तालुक्यातील 29 कुटुंबीयांना शासकीय आर्थिक मदत...

read more
विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्यपदी आमिन शेख यांची निवड…

विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्यपदी आमिन शेख यांची निवड…

१६वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन उदगीर येथे संपन्न झाले. या साहित्य संमेलन मध्ये विद्रोही...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]