loader image
[ays_poll id=7]

(बघा व्हिडीओ) मनमाड -तिरुपती एक्सप्रेस रेल्वे प्रवासी गाडी /नांदेड – मुंबई पॅसेंजर गाडी सुरू करावी-नितीन पांडे

Aug 27, 2022


मनमाड :भारतीय रेल्वे च्या दक्षिण – मध्य रेल्वे च्या सिकंदराबाद क्षेत्राची क्षेत्रीय रेल्वे सल्लागार समितीची ७४ वी बैठक दिनांक २६ ऑगस्ट २०२२ रोजी रेल्वे ऑफिसर क्लब हॉल सिकंदराबाद येथे सिकंदराबाद क्षेत्रा चे महाव्यवस्थापक (जनरल मॅनेजर GM) श्री अशोक कुमार जैन यांचे प्रमुख अध्यक्षतेखालील संपन्न झाली या बैठकीत दिंडोरी लोकसभा क्षेत्राच्या लोकप्रतिनिधी आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री आदरणीय डॉ. सौ. भारतीताई प्रविण पवार यांचे मुख्य प्रतिनिधी म्हणून भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष तथा दक्षिण मध्य रेल्वे च्या सिकंदराबाद क्षेत्रीय समिती चे सदस्य नितीन पांडे यांनी केंद्रीय मंत्री डॉ सौ भारतीताई पवार यांचे मार्गदर्शना मध्ये प्रवाशंसंबंधित महत्त्वपूर्ण सूचना व समस्या मांडल्या यामध्ये प्रामुख्याने नासिक जिल्ह्यातील प्रवाशांच्या व भाविकांच्या मागणी नुसार मनमाड – तिरुपती या मार्गावर दररोज धावणारी एक्स्प्रेस प्रवासी गाडी सुरू करावी अशी जोरदार मागणी नितिन पांडे यांनी या बैठकीत केली. मनमाड – नांदेड या रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरण तथा दुहेरीकरणा बाबतही नितिन पांडे यांनी प्रश्न उपास्थित केला असता मनमाड- रोटेगांव रेल्वे मार्ग चे विद्युती करण पूर्ण झाले असून रोटेगाव – औरंगाबाद ३० सप्टेंबर २०२२ पर्यन्त तर औरंगाबाद – जालना २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत तसेच जालना – नांदेड मार्गाचे विद्युतीकरण ३० सप्टेंबर २०२३ पर्यन्त पूर्ण करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले तसेच अंकाई – औरंगाबाद रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण बाबत विस्तृत डी पी आर भारतीय रेल्वे बोर्डाला सादर होणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी पांडे यांना दिली या महत्वपूर्ण निर्माण कार्याला प्राधान्य द्यावे अशी मागणी पांडे यांनी या वेळी केली. दक्षिण मध्य रेल्वे च्या नगरसुल रेल्वे स्थानका जवळील पोल क्रमांक २४/८ च्या निकट असणाऱ्या भुयारी रेल्वे मार्गात पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्या मुळे स्थानिक नागरिक व रेल्वे प्रवाशांना होणाऱ्या गंभीर त्रासाचा मुद्दा नितिन पांडे यांनी या बैठकीत उपस्थित करत या बाबत तात्पुरती कार्यवाही न करता या समस्या वर कायम स्वरुपी उपाय योजना करण्याची मागणी या बैठकीत केली. महाराष्ट्रची राजधानी मुंबई येथे विविध शासकीय कामांसाठी जाणे साठी सामान्य रेल्वे प्रवाशांना (ज्यांना एक्सप्रेस गाडीचा प्रवास परवडणारा नाही) मराठवाडा भागातून थेट रेल्वे गाडी नाही या भागातील प्रवाश्यांना मनमाड , नगरसुल येथे गाडी बदल करून मुंबई कडे खंडित प्रवास करावा लागतो त्यांचे सूविधे साठी मागणी नुसार नांदेड-मुंबई अशी दररोज धावणारी पॅसेंजर रेल्वे प्रवासी गाडी सुरू करावी अशी मागणीही केली. येवला व नगरसुल येथील स्थानिक प्रवाश्यान च्या मागणी नुसार नगरसुल रेल्वे स्थानकात नंदीग्राम एक्सप्रेस (११४०२-११४०१) तपोवन एक्सप्रेस (१७६१८-१७६१७) जनशताब्दी एक्सप्रेस (१२०७१-१२०७२) या रेल्वे प्रवासी गाड्यांना थांबा ,तिकिट, व आरक्षण देण्याची मागणी नितीन पांडे यांनी केली. वरील सर्व मागण्या ना वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे या बैठकीचे सूत्र संचालन दक्षिण मध्य रेल्वे च्या सिकंदराबाद क्षेत्राचे उपमहाव्यवस्थापक के एम नायडू यांनी केले बैठकीत दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या सहा राज्यातील सता विभागातील ५६ प्रतिनिधी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.