नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) : नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज नविन मका खरेदीचा शुभारंभ झाला.तीन ट्रॅक्टर नवीन मका आवक झाली नवीन ओली मका १९२५ रूपये दराने विक्री झाली.सदर मका आनंद ट्रेडींग कंपनी चे संचालक आनंद चोरडिया यांनी खरेदी केली .
वेहळगाव येथील शेतकरी अनिल बबन सानप यांनी दोन ट्रॅक्टर भरून मका आणली होती .

बाजार समितीच्या वतीने सचीव अमोल खैरणार यांनी शेतकरी अनिल सानप यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी जुनी मका २४५२ रूपये दराने विक्री झाली.
यावेळी व्यापारी सोमनाथ घोंगाणे,सचीन पारख,संजय करवा,आनंद चोरडिया,दिपक कासलीवाल,अभिजीत कासलीवाल,सुमेर कासलीवाल,गबुशेट अग्रवाल, ज्ञानेश्वर वाघ समितीचे लेखापाल भाऊसाहेब आगवण,बाबासाहेब साठे,सुनील पवार, मिलींद देवरे,सुरेश खैरणार,गणेश खान्देशी , समीर कासलीवाल यांच्यासह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.