loader image
[ays_poll id=7]

वेशभुषा स्पर्धा – छत्रेच्या विद्यार्थ्यांनी मिळविली उपस्थितांची दाद

Sep 1, 2022


मनमाड येथील छत्रे विद्यालयात शालेय वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात इयत्ता 5 वी ते 7 वी च्या विद्यार्थ्यांनी महापुरुष, स्वातंत्र्य सेनानी,राजकिय, पौराणिक,प्रादेशिक आदि वेशभूषा सादर करून मोठया संख्येने सहभागी होऊन उपस्थितांची दाद मिळवली.या प्रसंगी संस्थेचे सचिव दिनेश धारवाडकर, संचालक प्रसाद पंचवाघ, मुख्याध्यापक आर.एन थोरात, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे, पर्यवेक्षक प्रविण व्यवहारे, एस. एस पोतदार हे उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष कोकणे व निलेश जाधव यांनी केले. परीक्षक म्हणून शितल चव्हाण, सुनिल ईलग व किशोर देशपांडे यांनी काम पाहिले. आभार प्रदर्शन एस डी पवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी राज ठाकरे व कानिटकर व सकाळ सत्रातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
.