loader image
[ays_poll id=7]

प्रा.नितीन लालसरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘जनसंपर्क अधिकारी’ म्हणुन नियुक्ती

Sep 4, 2022

मनमाड : मनमाड शहराचे भुमीपुत्र आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणुन समाजात ओळख असणारे प्रा.नितीन लालसरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘जनसंपर्क अधिकारी’ म्हणुन पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली आहे.गेल्या आठ ते दहा वर्षांपासुन प्रा.लालसरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत यांचे अत्यंत विश्वासु अधिकारी म्हणुन काम करत आहे. गेल्या सरकारमध्ये देखील प्रा.लालसरे यांच्याकडे नामदार श्री एकनाथ शिंदे यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणुन जबाबदारी होती .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासु आणि जबाबदार अधिकाऱ्यांपैकी प्रा.नितीन लालसरे हे एक असुन , काही महिन्यांपूर्वी मनमाड येथे संपन्न झालेल्या प्रा.लालसरे यांच्या विवाह सोहळ्याप्रसंगी देखील नामदार एकनाथ शिंदे आवर्जुन उपस्थित होते. आयुष्यातील आलेल्या अनेक अडचणींवर मात करून , कठोर परिश्रम , उच्चशिक्षण घेऊन आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर सर्वसामान्य कुटुंबातुन मोठे झालेले प्रा.नितीन लालसरे यांची राज्याचे मुख्यमंत्री यांचे 'जनसंपर्क अधिकारी' या अत्यंत महत्वाच्या पदावर झालेली नियुक्ती ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. या पदाला नक्कीच न्याय देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने समाजातील गरजवंत नागरिकांची सेवा करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल अशी प्रतिक्रिया प्रा. नितिन लालसरे यांनी दिली.

मुख्यमंत्री जनसंपर्क अधिकारी या महत्वाचा पदावर झालेल्या नियुक्ती बद्दल समाजातील सर्व स्थरातुन प्रा.नितिन लालसरे यांचे अभिनंदन होत आहे.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-रापली हद्दीत रेल्वे चे दुहेरीकरणाचे काम शेतकर्यांनी पाडले बंद – रेल्वे अधिकाऱ्याने अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप

बघा व्हिडिओ-रापली हद्दीत रेल्वे चे दुहेरीकरणाचे काम शेतकर्यांनी पाडले बंद – रेल्वे अधिकाऱ्याने अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप

चांदवड तालुक्यातील रापली हद्दीत शेतकऱ्यांनी केले दुहेरीकरण रेल्वेचे काम केले बंद आज दि 09/01/2024...

read more
नाशिक मध्ये पहिल्यांदाच होणार राष्ट्रीय युवा महोत्सव – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार

नाशिक मध्ये पहिल्यांदाच होणार राष्ट्रीय युवा महोत्सव – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार

नाशिक - राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड ही अभिमानाची बाब असून हा महोत्सव यशस्वी करण्याची...

read more
अखिल भारतीय खुली ग्राफलिंग अजिंक्यपद स्पर्धेत मनमाड महाविद्यालयास कास्यपदक

अखिल भारतीय खुली ग्राफलिंग अजिंक्यपद स्पर्धेत मनमाड महाविद्यालयास कास्यपदक

हरियाणा येथे झालेल्या ४ थी अखिल भारतीय खुली ग्रापलिंग अजिंक्यपद स्पर्धेत महात्मा गांधी विद्यामंदिर...

read more
मनमाड महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त स्त्री पुरुष समानता या विषयावर व्याख्यान संपन्न

मनमाड महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त स्त्री पुरुष समानता या विषयावर व्याख्यान संपन्न

मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
के आर टी हायस्कूल व जुनिअर कॉलेज येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

के आर टी हायस्कूल व जुनिअर कॉलेज येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

येथील के आर टी हायस्कूल व जुनिअर कॉलेजमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती "बालदिन...

read more
.