मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज, मनमाड मध्ये क्रांतीज्योती, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सदस्या आयशा सलीम गाजीयानी, शाळेचे मुख्याध्यापक भुषण दशरथ शेवाळे यांच्या हस्ते सावित्रीबाईच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी शाळेचे पर्यवेक्षक अन्सारी शाहीद अख्तर व शेख आरीफ कासम व सर्व शिक्षक,शिक्षकेतर उपस्थित होते. प्रास्ताविक उपशिक्षिका सौ. दखणे आरती यांनी मांडली. तसेच शाळेच्या विद्याथीनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभुषा स्विकारली होती. शाळेतील विदयार्थ्यानींनी व शाळेचे उपशिक्षक श्री जगताप शानूल सुभाष यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या जिवनपटावर माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपशिक्षिका सौ.कराड सविता सचिन यांनी केले. संस्थेचे सदस्या आयशा सलीम गाजियानी यांचे मार्गदर्शन लाभले.