loader image
[ays_poll id=7]

श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज (बोलठाण) येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

Sep 6, 2022


नांदगाव : नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज, येथे संस्थेच्या वतीने शिक्षक दिन उत्साहात साजरा. ५ सप्टेंबर भारतरत्न डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्रजी नहार,सचिव सुरेंद्रजी नहाटा,ज्येष्ठ संचालक सुभाषजी नहार,महावीरजी नहाटा, प्रकाश रिंढे उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. आजच्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधु-भगिनींचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ शिक्षक श्री.साबळे सर यांनी केले.व संस्थेच्या वतीने सचिव सुरेंद्रजी नहाटा, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.व शिक्षकांप्रती आदर भाव व्यक्त केला. इ १० वी च्या विद्यार्थ्यांनी अध्यापनाचे काम केले इ १०वी च्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधु-भगिनींचा आदर म्हणून सत्कार केला.यावेळी काही १०वी,व ९ वी च्या विद्यार्थ्यांनी शिक्षक, लिपिक,शिपाई यांच्या भूमिकेत संपूर्ण शालेय कामकाज बघितले. यानंतर समारोपाच्या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन १०वी अ चे विद्यार्थी ‘गौरव कोल्हे,व श्रावणी जगताप यांनी केले. प्रा.नंद सर, साबळे सर, पाटील सर, पर्यवेक्षक .बोरसे सर,व मुख्याध्यापक .शेलार सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर विद्यार्थ्यांच्या वतीने साहस कायस्थ व युवराज साळुंके यांनी स्वागत गीत सादर केले.कु.गौरी वाळेकर,कु.तेजश्री दरेकर व गौरव कोल्हे यांनी आपले विचार व्यक्त केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी १०वी चे वर्गशिक्षक .साबळे सर, सूर्यवंशी सर, .जे.बी.पाटील सर, तसेच सहकारी शिक्षक,प्रा.नंद सर, कायस्थ सर,बागुल सर, बंड सर, पाटील डी.एम‌. सर,लाठे सर, पवार सर, गांगुर्डे सर, ठाकरे सर, बापु रिंढे सर, आर. के. सोनवणे सर, जगताप मॅडम, कायस्थ मॅडम, पवार मॅडम, पटेल मॅडम, जाधव मॅडम, बोबडे मॅडम , तसेच लिपिक मुथा मॅडम, जैन संदेश, सोनवणे ए.आर. सोळुंके डी. यु. वाघ बी.ए. पवार संजय, पवार संदिप इतर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
विद्यालयाचे प्राचार्य श्री विजय शेलार पर्यवेक्षक श्री संतोष बोरसेविद्यालयाचे सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.