loader image
[ays_poll id=7]

सोनवणे जळीतकांड प्रकरणातील आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

Sep 8, 2022


तब्बल ११ वर्षानंतर अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे जळीत कांडातील दोषींना न्यायालयाने दिली शिक्षा
मनमाड – मालेगावचे तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे जळीत हात्यकांडचा ११ वर्षानंतर आज निकाल लागला असून मालेगाव अप्पर जिल्हा सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. मच्छिंद्र सुरवडकर, राजू शिरसाट आणि अजय शंकर सोनवणे असे तिन्ही दोषींचे नाव आहे.
अकरा वर्षापूर्वी दिवसाढवळ्या थेट अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना जिवंत जाळण्याच्या या प्रकाराने केवळ नाशिकच नाही तर संपूर्ण राज्यच हादरले होते. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला २५ जानेवारी २०११ रोजी अप्पर जिल्हाधिकारी सोनवणे मनमाडपासून जवळ असलेल्या इंधनाच्या अवैध अड्डयावर छापा मारण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथील इंधन माफियानी त्यांना जिवंत जाळून ठार मारले होते. या घटनेची देशभरातच चर्चा झाली. या प्रकरणात मुख्य आरोपी पोपट शिंदे सोबत मच्छिन्द्र सुरवडकर, राजू सिरसाट, अजय सोनवणे आणि कुणाल शिंदे असे पाच आरोपी होते. त्यापैकी पोपट शिंदे यांचा मृत्यू झाला आहे तर कुणाल शिंदे हा त्यावेळी अल्पवयीन होता. त्यामुळे त्याच्यावर बाल न्यायलयात खटला सुरु आहे.

मनमाडजवळच्या पानेवाडी शिवारात प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भेसळ माफियांनी तत्कालीन मनमाड अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना जिवंत जाळून मारल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभर पडले होते. या प्रकरणातील प्रमुख आरोपी पोपट शिंदेसह अकरा जणांना आरोपी करण्यात आले होते. मात्र सोनवणे यांना जाळून मारण्याच्या घटनेवेळी पोपटही भाजला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. आता ३ आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने जन्म ठेपेची शिक्षा ठोठावली आहे. घटनेचे पडसाद संपूर्ण देशभर पसरले असून राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेला जवळपास ११ वर्षे होत आली असून आता आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला संघात निवड

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने )...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील सुयश पवार , हसनेन शेख , खुशाल परळकर , गौरव निते व सौरभ चव्हाण यांची नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 14 वर्षातील संघाच्या संभाव्य खेळाडु यादित निवड.

भुमी क्रिकेट अकॅडमीतील सुयश पवार , हसनेन शेख , खुशाल परळकर , गौरव निते व सौरभ चव्हाण यांची नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 14 वर्षातील संघाच्या संभाव्य खेळाडु यादित निवड.

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नाशिक...

read more
साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय युथ ज्युनियर सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत...

read more
.