loader image
[ays_poll id=7]

जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधून आईच्या पुण्यस्मरणा निमित्त शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप

Sep 8, 2022


 

नांदगाव ( सोमनाथ घोंगाणे)
नांदगाव तालुक्यातील जातेगांव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत दि.८ सप्टेंबर गुरुवार रोजी जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधून नांदगाव येथील दैनिक आवाज या वृत्तपत्राचे संपादक/ पत्रकार भगवान सोनवणे यांनी त्यांच्या आई कै. सकुबाई सोनवणे यांच्या २३ व्या पुण्यस्मरणा निमित्त अनुसूचित जाती व जमाती मधिल १५१ विद्यार्थ्यांना पाणी पिण्याच्या बाटल्या, जेवणाचे डबे आणि शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप वाटप केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शालेय शिक्षण समितीचे सभापती कृष्णा शिंदे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदगाव येथील प्रेस फोटो ग्राफर शंकर नाना विसपुते, अँड . किरण जाधव ‘वैभव कुमावत ‘ गौरव बोरसे ‘ अरुण हिंगमिरे ‘ भरत पाटील ‘ ईश्वर जाधव ‘वाल्मीक वरपे ‘ प्रभाकर निंबारे हे होते.
याप्रसंगी भगवान सोनवणे यांनी सांगितले की प्रत्येकाच्या जिवनात पहिले आई वडील हे असतात आईचे अनन्य साधारण महत्व असून शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, या स्पर्धेच्या युगात जो शिकेल तोच टिकेल असे सांगितले व आई साठी एक कविता सादर केली. तसेच मुख्याध्यापक अनिल बंड,अँड किरण जाधव, व ईश्वर जाधव यांनी आणि शाळेतील कृष्णा पवार, कार्तिक पवार, अनिकेत निकम, कार्तिक पगारे, अदित्य गायकवाड, सिध्दांत त्रिभुवन, अनन्य महाले, प्रगती चव्हाण विद्यार्थ्यांनी जिवनातील आईचे महत्त्व या विषयावर मनोगत व्यक्त केले.
यावेळी निलेश शितोळे, संतोष पवार, रामदास चव्हाण, सचिन जाधव, भुपेंद्र महाजन, रंजना चौधरी, दैवशाला मरवळे, शोभा ढाले, संध्या चव्हाण हे शिक्षक व शिक्षीका हजर होत्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्र प्रमुख सुभाष चव्हाण यांनी केले तर मुख्याध्यापक अनिल बंड यांनी पत्रकार सोनवणे यांनी गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना आईच्या पुण्यस्मरणा निमित्ताने शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप केल्याबद्दल विषेश आभार मानले


अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी करण्यात आली.

के आर टी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर. उपप्राचार्य वैभव कुलकर्णी. मुख्याध्यापक...

read more
केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्र प्रथम  स्वच्छता प्रेमी नागरिक, राबणारे सफाई कामगारच यशाचे खरे हीरो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्र प्रथम स्वच्छता प्रेमी नागरिक, राबणारे सफाई कामगारच यशाचे खरे हीरो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  राज्यातील नागरिकांचे केले अभिनंदन, स्वच्छतेत सातत्य राखण्याचे आवाहन केंद्र सरकारच्या स्वच्छ...

read more
एकनाथ महाराज धार्मिक , सांस्कृतिक आणि अध्यात्मिक असे संपन्न व्यक्तिमत्त्व – हभप सदगीर महाराज

एकनाथ महाराज धार्मिक , सांस्कृतिक आणि अध्यात्मिक असे संपन्न व्यक्तिमत्त्व – हभप सदगीर महाराज

  मनमाड : (योगेश म्हस्के) येथे आयोजित करण्यात आलेल्या संस्कृती संवर्धन समिती आयोजित स्वामी...

read more
बघा व्हिडिओ-रापली हद्दीत रेल्वे चे दुहेरीकरणाचे काम शेतकर्यांनी पाडले बंद – रेल्वे अधिकाऱ्याने अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप

बघा व्हिडिओ-रापली हद्दीत रेल्वे चे दुहेरीकरणाचे काम शेतकर्यांनी पाडले बंद – रेल्वे अधिकाऱ्याने अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप

चांदवड तालुक्यातील रापली हद्दीत शेतकऱ्यांनी केले दुहेरीकरण रेल्वेचे काम केले बंद आज दि 09/01/2024...

read more
.