loader image
[ays_poll id=7]

के आर टी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत यंदा शिक्षक दिन उत्साहात साजरा

Sep 10, 2022

शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत सोमवारी मनमाड येथील कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

गेली दोन वर्ष शिक्षक दिनावर कोरोनाची सावट होते शाळा बंद होती त्यामुळे भव्य स्वरूपात शिक्षक दिन साजरा करण्यात आला नाही पण यंदा निर्बंध मुक्त वातावरणामुळे शिक्षक दिनाचा उत्साह आमच्या शाळेत दिसून आला.

यानिमित्त माजी राष्ट्रपती शिक्षकतज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे प्राचार्य श्री मुकेश मिसर सर यांनी केले. शिक्षकांनी जीवनातील शिक्षकांचे स्थान व शिक्षकांचे महत्त्व कोरोना काळातही शिक्षकांनी ऑनलाइन पद्धतीने शिक्षणासाठी दिलेले योगदान यावर मीसर सरांनी चर्चा केली त्यावेळी उपप्राचार्य वैभव कुलकर्णी मुख्याध्यापक दीपक व्यवहारे विश्वस्त धनंजय निंभोरकर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. इयत्ता नववी इयत्ता चौथीच्या आरोही कोरपे व दिव्या रायते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. इयत्ता नववीच्या आदित्य सोनवणे याने आपले विचार मांडले. ब्राह्मी गायकवाड प्रांजल कराड यांनी शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पत्करत विद्यार्थ्यांनी अध्यापनाचे कार्य केले. कार्यक्रमाला इयत्ता दहावीचे विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते विद्यार्थी शिक्षक ब्राह्मी गायकवाड , अभिनव दराडे मुख्याध्यापक श्रेया पांडे गुंजन सांगळे रूपाली कहांडळ शुभम सरस्वते प्राचार्य प्रकाशा दराडे विश्वस्त प्रेरणा पाटील प्रेरणा चौधरी यांनी शालेय कामकाजा नियोजन केले सर्व विद्यार्थी शिक्षकांनी अध्यापनाचे काम चोख बजावले सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रावणी चव्हाण, सई सोमासे यांनी पार पाडले.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.