loader image
[ays_poll id=7]

घरगुती गणेशोत्सव देखावा स्पर्धेला उदंड प्रतिसाद

Sep 13, 2022

मनमाड : मनमाड शहर मराठी पत्रकार संघाच्या वतीने गणेशोत्सवानिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरणपुरक घरगुती देखावा स्पर्धेस मनमाडकरांनी मोठा प्रतिसाद दिला असून या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यानिमित्त घरोघरी गणेशाच्या सजावटीत मुलांवर पर्यावरण वाचविण्यासंबंधी संस्कार व्हावेत यासाठी सामाजिक बांधीलकी जपत या आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते

मराठी पत्रकार परिषद संलग्नीत नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघ व मराठी पत्रकार संघाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांचा सन्मान सोहळा संघातर्फे आयोजित करण्यात आला होता. आता गणेशोत्सवानिमीत्त मुलांवर पर्यावरण रक्षणाचे संस्कार व्हावे घरोघरी गणेशाच्या सजावटीत मुलांवर पर्यावरण वाचविण्यासंबंधी संस्कार व्हावेत यासाठी सामाजिक बांधीलकी जपत या पर्यावरणपुरक घरगुती देखावा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेस मनमाडकर नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. नागरिकांनी कल्पकतेने तयार केलेल्या आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या देखाव्यांचे फोटो या स्पर्धेसाठी पाठविले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक अमोल परदेशी व मयंक पाटील यांना विभागून तर द्वितीय क्रमांक निलेश जाधव यांना तर तृतीय क्रमांक तनिष्का पटेल यांना जाहिर झाला आहे. उत्तेजनार्थ पारितोषिक वैशाली रसाळ व जान्हवी महाले यांना जाहिर झाले आहे. या स्पर्धेसाठी मिलिंद वाघ, डी. आर. जाधव, आर. एम. ठाकरे आणि आर. डी. पाटील या कलाशिक्षकांनी परिक्षणाचे काम केले. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. तर विजयी स्पर्धकांच्या घरी जावून पारितोषीक वितरण केल्याची माहिती तालुका समन्वयक अमोल खरे यांनी दिली आहे. पत्रकार संघातर्फे संयोजन समितीचे अशोक बिदरी, उपाली परदेशी, योगेश म्हस्के, निलेश व्यवहारे, गणेश केदारे यांनी या स्पर्धेचे संयोजन केले. तर जेष्ठ पत्रकार नरेश गुजराथी, जेष्ठ पत्रकार अशोक परदेशी, सतिष शेकदार, नरहरी उंबरे, संदीप देशपांडे, अजय सोनवणे, निलेश वाघ, तुषार गोयल, नाना आहिरे, सौ स्वाती गुजराथी, सौ दीपाली खरे, सौ नैवेद्या बिदरी, रुपाली केदारे, अफरोज अत्तार, सॅमसंन आव्हाड, आंनद बोथरा यांनी आयोजन केले.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.