Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

चांदवड तंत्रनिकेतनात पालक मेळावा संपन्न

Sep 14, 2022

चांदवड येथील श्री एस.एन.जे.बी संचलीत श्री एच.एच.जे.बी तंत्रनिकेतनमध्ये दिनांक ०८/०९/२०२२ रोजी तृतीय वर्षासाठी व दिनांक १२/०९/२०२२ रोजी द्वितीय वर्षासाठी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सद्य स्थितीत पालकांची असलेली जबाबदारी त्यांनी कशी पार पाडावी. येत्या शैक्षणिक वर्षात भरघोस यश संपादन करण्यासाठी पालकांची भुमिका कशी असावी या बद्दल उपप्राचार्य श्री.एच.एस. गौडा यांनी मार्गदर्शन केले. श्री.जी.एम.लोढा. यांनी संस्थेबद्दलची माहिती पालकांना प्रस्तुत केली.
पालकांकडून आलेल्या समस्यांचे विभाग प्रमुख श्री.पी.आर. साळी यांनी निरसन केले. तृतीय वर्षासाठी सूत्रसंचालन कुमारी.ए.एस.बारहाते व आभार प्रदर्शन कुमारी ए.एस.शिंदे यांनी केले. तसेच द्वितीय वर्षासाठी सूत्रसंचालन कुमारी एम.बी.शिंदे व आभार प्रदर्शन श्री.ए.ए.पवार यांनी केले. संगणक तंत्रज्ञान विभागातील सर्व कार्यक्रम हा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्याचे सहकार्य लाभले. माननीय प्राचार्य डॉ. वि.अ.वानखेडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विश्वस्त समितीचे अध्यक्ष मा.श्री बेबीलालजी संचेती व विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष मा. श्री दिनेशजी लोढा, मानद सचिव मा.श्री जवाहरलालजी आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष मा.श्री अजीतकुमारजी सुराणा, प्रबंध समितीचे उपाध्यक्ष आणि तंत्रनिकेतनाचे समन्वयक मा. श्री अरविंदकुमारजी भन्साळी, सह मानद सचिव मा.श्री.झुंबरलालजी भंडारी व तंत्रनिकेतनाचे मुख्य समन्वयक तथा प्रबंध समिती सदस्य मा.श्री राजेंद्रकुमारजी बंब यांनी या आयोजनाबद्दल संबंधितांचे अभिनंदन केले .

अजून बातम्या वाचा..

स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेस आज पासुन प्रारंभ….प्रथम पुष्प : श्री विवेक घळसासी

स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेस आज पासुन प्रारंभ….
प्रथम पुष्प : श्री विवेक घळसासी

मनमाड : संस्कृती संवर्धन समिती आयोजित रौप्य महोत्सवी वर्ष यशस्वीपणे पूर्ण करणारी महाराष्ट्रातील एक...

read more

शिवसंस्कार बहुउद्देशिय संस्थेद्वारे दर्पणपत्र दिनानिमित्त केला पत्रकारांचा सन्मान

नांदगाव येथील सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण संवर्धन करण्यासाठी सतत क्रियाशील असणारी संस्था म्हणजे...

read more

नांदगाव तालुक्यात पत्रकारांची भक्कम एकजूट विधायक उपक्रम राबविणार; पत्रकार दिनी निर्धार

नांदगाव तालुक्यात पत्रकार संघाची भक्कम एकजुट तयार करण्याचा निर्धार व्यक्त करत पत्रकारांपुढील बदलती...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]