Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने वृक्षारोपण अभियान संपन्न

Sep 15, 2022

मनमाड 🙁 योगेश म्हस्के)येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक आणि बालसंस्कार केंद्राच्या वतीने आय.यु.डी.पी. परिसरामध्ये मनमाड नगर परिषदेच्या वतीने नव्याने विकसीत होणाऱ्या उद्यानामध्ये वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले.

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ , त्र्यंबकेश्वर आणि बालसंस्कार व युवा प्रबोधन विभाग आयोजित महावृक्षारोपण आणि संवर्धन अभियाना अंतर्गत एक सेवेकरी एक झाड संकल्पनेद्वारे दि.1 जुन 2022 ते 30 सप्टेंबर 2025 या तीन वर्षांत संपुर्ण राज्यामध्ये 1 कोटी स्वदेशी झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. आज शहरामध्ये याच अभियानाचा भाग म्हणुन मनमाड येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने गुरुपुत्र श्री नितीन भाऊ मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी यांनी उपस्थित सेवेकऱ्यांना स्वदेशी वड, पिंपळ,कडुलिंब औदुंबर, बेल,तुळस इत्यादी झाडांचे ,वृक्षारोपणाचे महत्व सांगुन मार्गदर्शन केले .

या कार्यक्रमाला शहरातील प्रमुख मान्यवर , श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे पुरुष आणि महिला तसेच बालसंस्कारातील बाल सेवेकरी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

झोनल सचिव सतिशभाऊ केदारे यांची कन्या डॉ. प्रियांका सतिश केदारे यांनी बी.डी.एस. पदवी संपादन केलेल्या बद्दल सत्कार

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन, ट्रॅक्शन कारखाना,नाशिक रोड तर्फे झोनल सचिव सतिशभाऊ...

read more

सुशासन दिन मा.पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त भाजपा विद्यार्थी आघाडी तर्फे गरजु लोकांना ब्लॅंकेट वाटप

भारताचे माजी पंतप्रधान,भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी भारतात...

read more

वेटलिफ्टींग स्पर्धेत जय भवानी व्यायाम शाळा व कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मनमाडच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

सी, डी, जैन महाविद्यालय श्रीरामपूर येथे संपन्न झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]