Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने वृक्षारोपण अभियान संपन्न

Sep 15, 2022

मनमाड 🙁 योगेश म्हस्के)येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक आणि बालसंस्कार केंद्राच्या वतीने आय.यु.डी.पी. परिसरामध्ये मनमाड नगर परिषदेच्या वतीने नव्याने विकसीत होणाऱ्या उद्यानामध्ये वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले.

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ , त्र्यंबकेश्वर आणि बालसंस्कार व युवा प्रबोधन विभाग आयोजित महावृक्षारोपण आणि संवर्धन अभियाना अंतर्गत एक सेवेकरी एक झाड संकल्पनेद्वारे दि.1 जुन 2022 ते 30 सप्टेंबर 2025 या तीन वर्षांत संपुर्ण राज्यामध्ये 1 कोटी स्वदेशी झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. आज शहरामध्ये याच अभियानाचा भाग म्हणुन मनमाड येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने गुरुपुत्र श्री नितीन भाऊ मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी यांनी उपस्थित सेवेकऱ्यांना स्वदेशी वड, पिंपळ,कडुलिंब औदुंबर, बेल,तुळस इत्यादी झाडांचे ,वृक्षारोपणाचे महत्व सांगुन मार्गदर्शन केले .

या कार्यक्रमाला शहरातील प्रमुख मान्यवर , श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे पुरुष आणि महिला तसेच बालसंस्कारातील बाल सेवेकरी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

शाळेची शैक्षणिक ऋणमुक्ती म्हणून स्व:खर्चाने केले रंगकाम व कार्यालयाचे नुतनीकरण!

मनमाड येथील छत्रे न्यू इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी सुदर्शन वाल्मिक दराडे यांनी शाळेची शैक्षणिक...

read more

धोटाणे बुद्रुक आणि पांझणदेव(ता.नांदगाव)येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ, एका महिलेसह एका बालिकेस चावा, दोन्ही ही गंभीर जखमी.

मनमाड(वार्ताहर):- येथून जवळच असलेल्या धोटाणे बुद्रुक आणि पांझणदेव(ता.नांदगाव)येथे पिसाळलेल्या...

read more

मनमाड शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी ” जागृती अभियान ” राबवावे – राजाभाऊ पारिक

मनमाड - मनमाड शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी शहरात स्वच्छते संदर्भात जागृती अभियान राबविणे गरजेचे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]