मनमाड येथील छत्रे न्यू इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी सुदर्शन वाल्मिक दराडे यांनी शाळेची शैक्षणिक ऋणमुक्ती म्हणून सीतालक्ष्मी हौलचे संपूर्ण रंगकाम व लिपिक कार्यालयाचे नुतनीकरण स्व:खर्चाने करून दिले. संस्थेच्या वतीने सुदर्शन दराडे यांचा सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले.
सुदर्शन दराडे यांच्या शुभहस्ते सीतालक्ष्मी हौलचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.











