मेष – आज शारीरिक आणि मानसिक स्वास्थ साधारण राहील. खर्चाच्या काळजीमुळे मन अशांत राहील. वाणीवर संयम ठेवणे आवश्यक आहे.
वृषभ – आजचा दिवस उत्साह आणि प्रसन्नतेचा आहे. प्रकृती चांगली असल्याने सुख आणि आनंद अनुभवाल. सगे सोयरे किंवा मित्रांकडून उपहार मिळतील.
मिथुन – आज आपल्याला बोलण्यावर व व्यवहारात सावध राहावे लागेल. आपल्या वक्तव्याने काही गैरसमज होण्याची शक्यता आहे. आपले स्वास्थ खराब असू शकते.
कर्क – आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरी व्यवसायात अनुकूल वातावरण असेल. धनलाभाची शक्यता आहे.
सिंह – आज दृढ आत्मविश्वास आणि मनोलब यामुळे तुम्ही कामात यशस्वी व्हाल. नोकरी, व्यवसाय, व्यापारात तुमच्या बुद्धीमत्तेची चुणूक दिसेल. नोकरीत पदोन्नती संभवते.
कन्या – आजचा दिवस आनंदात जाईल. आर्थिक फायदा होईल. परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांकडून आनंददायी बातम्या समजल्याने आपण आनंदीत व्हाल.
तूळ – आज शक्यतो कुठल्याही नव्या कामाचा आरंभ न करणे हिताचे राहील. आपले वक्तव्य आणि वर्तन यावर नियंत्रण ठेवल्यास गैरसमज टाळून होणारे नुकसान टाळता येईल.
वृश्चिक – आजचा दिवस आपण आनंदात आणि उल्हासात घालवाल. रोजच्या कामातून वेळ काढून स्वत:साठी थोडा वेळ काढू शकाल. मित्रांसह एखाद्या प्रवासास जाल.
धनु – आजचा दिवस शुभफलदायी आहे. स्वास्थ्य उत्तम राहील. यश, कीर्ती आनंद यांची प्राप्ती होईल. कुटुंबीयांसह आनंदात वेळ घालवू शकाल.
मकर – आज आपण मनाने खूप अशांत राहाल. आज आपण कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकणार नाहीत. आज आपणास नशिबाची साथ न मिळाल्याने आपणास नैराश्य येईल.
कुंभ – आज आपण अतिसंवेदनशील झाल्याने आपले मन अस्वस्थ आणि बैचेन होईल. जिद्दी बनाल. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता आहे.
मीन – आजचा दिवस महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अनुकूल आहे. विचारात दृढता राहील. कामे पूर्ण होती.




