loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २० सप्टेंबर २०२२ – मंगळवार

Sep 20, 2022


मेष – विचारांच्या गतिशिलतेमुळे द्विधा मनस्थिती राहील. त्यामुळे कोणत्याही निर्णयाप्रत आपण येऊ शकणार नाबही. आजचा दिवस नोकरी-व्यवसायातील स्पर्धेचा राहील आणि त्यात यशस्वी होण्याचा प्रयत्न तुम्ही कराल.

वृषभ – द्विधा मनस्थितीमुळे केलेल्या व्यवहारात आपण अडचणीत येऊ शकता. त्यातून बाहेर पडण्यासाठी महत्त्वाचा वेळ खर्च करावा लागेल. आपला हट्टी स्वभाव न सोडल्यास कोणाशी चर्चेदरम्यान संघर्ष होऊ शकतो.

मिथुन – आजच्या दिवसाचा प्रारंभ शरीर आणि मनाच्या टवटवीतपणामुळे चांगला होईल. मित्र आणि कुटुंबीयांसह घघरात किंवा बाहेर मनपसंत भोजनाचा आनंद लुटाल. सुंदर कपडे परिधान करून बाहेर जाल.

कर्क – आजचा दिवस जास्त खर्च होण्याचा आहे. कौटुंबिक वातावरण फारसे समाधानकारक असणार नाही. कुटुंबीयांशी मतभेद संभवतात. मनात निर्माण होणाऱ्या अनिश्चिततेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील.

सिंह – कोणत्याही गोष्टीत खंबीर मनाने निर्णय घेऊ न शकल्याने समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही. मन विचारात अडकून पडेल. मित्रांकडून विशेषत: स्त्रीवर्गाकडून लाभ होईल.

कन्या – आजचा दिवस नवीन काम सुरू करण्यास किंवा नवीन योजना अमलात आणण्यास अनुकूल आहे. व्यापारात लाभ होईल. जुने येणे वसूल होईल. नोकरीत पदोन्नती संभवते. पितृघऱाण्याकडून लाभ होईल,

तूळ – आज नोकरीच्या ठिकाण वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. संतती विषयक काळजी वाटेल. दूरवरच्या प्रवासाचे नियोजन कराल. लेखन आणि साहित्य निर्मिती होईल.

वृश्चिक – आजचा दिवस शांततेत आणि सावधानतेत घालवावा लागेल. नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता असल्याने आज नवीन कामे सुरू न करणे हितावह राहील. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

धनु – आजचा दिवस आनंदात जाईल. मित्रांसह एखादा प्रवास, एखादी सहल ठरवाल. लेखनकार्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. भागीदारीतून फायदा होईल.

मकर – आजचा दिवस व्यापार-व्यवसायातील प्रगती आणि आर्थिक नियोजन यासाठी अनुकूल आहे. वसुली तसेच आर्थिक देवाण-घेवाणीत यश मिळेल. आर्थिक लाभ होतील.

कुंभ – आजचा दिवस मानसिक अशांतता आणि उद्विग्नता यांनी भरलेला आहे. सातत्याने विचार बदलत राहतील त्मुळे निर्णायकता असणार नाही. कामात अपयश आल्याने निराश व्हाल.

मीन – आज दक्षता बाळगण्याची गरज आहे. कुटुबीयांशी मतभेद होतील. आईची प्रकृती हा चिंतेचा विषय होईल. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.


अजून बातम्या वाचा..

.