Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

कर्मवीर राजाराम सखाराम वाघ जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेला उत्साहात सुरुवात

Sep 23, 2022

दिंडोरी प्रतिनिधी शालेय जीवनात ज्या विद्यार्थ्यांना वकृत्व स्पर्धेतून बोलण्याची संधी मिळाली असे अनेक विद्यार्थी भावी काळात उत्तम वक्ते म्हणून तयार होतात शालेय वकृत्व स्पर्धेतून अशा व त्यांची जडणघडण होते म्हणून पालक आणि शिक्षक यांनी विद्यार्थी दशेतच विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास मुलांना वकृत्व कलेची आवड व प्रेरणा मिळेल वकृत्व कलही मानसन्मान व अर्थार्जण देणारी आहे असे मत कादवा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व कर्मवीर रासवाघ शैक्षणिक संस्थेचे उपाध्यक्ष सुभाषराव शिंदे यांनी कादवा कारखाने ते जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय भाषण करताना व्यक्त केले.


कादवा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील बीके कावळे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय येथे कर्मवीर राजाराम सखाराम वाघ शिक्षण संस्थेच्या वतीने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन 27 व्या वर्षी करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन कादवा कारखानाचे पदाधिकारी सुभाषराव शिंदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून संपन्न झाले यावेळी कादवा कारखानाचे संचालक मधुकर गटकळ दादासाहेब पाटील दिनकरराव जाधव कवी विठ्ठल व संधान साहित्यिक विजय मिठे अशोकराव वाघ आदी मान्यवर उपस्थित होते
स्पर्धेचे प्रास्ताविक प्राचार्य बीके शेवाळे तर स्वागत पर्यवेक्षिका श्रीमती व्ही आर जाधव विभाग प्रमुख बाळासाहेब वडजे यांनी केले स्वागत गीत मंच व संगीतशिक्षक बगाड व मार्कड यांच्या मार्गदर्शनाखाली झाले
उद्घाटन समारंभ नंतर कवी विठ्ठल संधान साहित्यिक विजय मिठे यांनी मनोगत व्यक्त करताना वकृत्व स्पर्धेची आजच्या काळात नितांत गरज या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले तर उद्घाटक व कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष शिंदे यांनी बोलणं ही एक कला आहे सध्याच्या युगात सूत्रसंचालन हा एक महत्त्वाचा धागा प्रत्येक कार्यक्रमात कार्यक्रमाची उंची वाढवतो शालेय जीवनात वकृत्व स्पर्धेमधून विद्यार्थ्यांची वकृत्वाची जडणघडण होते व भविष्यात हेच विद्यार्थी उत्तम वक्ता व सूत्रसंचालक म्हणून नावारूपास येतात म्हणून पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात नाव कमावण्यासाठी शिक्षकांनी व पालकांनी त्यांच्यातील कलागुण ओळखून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सुरेश भुसाळ यांनी केले स्पर्धा विभाग प्रमुख सुरेश सलादे यांनी आभार मानले नाशिक जिल्ह्यातून या नावाजलेल्या स्पर्धेत 40 शाळांचे एकूण 90 विद्यार्थी सहभागी झालेले आहेत कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर रास वाघ शिक्षण संस्थे चे अध्यक्ष शहाजी दादा सोमवंशी उपाध्यक्ष सुभाष शिंदे सचिव बाळासाहेब उगले व संचालक मंडळाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन केलेले असून बी के कावळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय प्राचार्य शेवाळे सर पर्यवेक्षिका व्ही आर जाधव बाळासाहेब वडजे व विद्यालय या स्पर्धेचे संयोजक आहेत
या जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत इयत्ता पहिली ते चौथी इयत्ता पाचवी ते सातवी इयत्ता आठवी ते दहावी आणि ज्युनिअर कॉलेज या चार गटात विजेत्यांना स्मृतीचिन्ह सन्मानपत्र व रोख स्वरूपात बक्षीस देऊन सन्मानित केले जाणार आहे कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालानंतर नाशिक जिल्ह्यातील पहिली वकृत्व स्पर्धा म्हणून या स्पर्धेला शाळा व स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावलेली आहे.

अजून बातम्या वाचा..

केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्र प्रथम  स्वच्छता प्रेमी नागरिक, राबणारे सफाई कामगारच यशाचे खरे हीरो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्र प्रथम स्वच्छता प्रेमी नागरिक, राबणारे सफाई कामगारच यशाचे खरे हीरो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  राज्यातील नागरिकांचे केले अभिनंदन, स्वच्छतेत सातत्य राखण्याचे आवाहन केंद्र सरकारच्या स्वच्छ...

read more
गुड शेफर्ड स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.

गुड शेफर्ड स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.

मनमाड:- मनमाड येथील गुड शेफर्ड स्कूलमध्ये स्वराज्याची जणनी राजमाता जिजाऊ मासाहेब यांची जयंती व...

read more
🛑 फलक रेखाटन                                       दि. १२ जानेवारी २०२४.      युवा दिन ,स्वामी विवेकानंद जयंती, व स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ जयंती.

🛑 फलक रेखाटन दि. १२ जानेवारी २०२४. युवा दिन ,स्वामी विवेकानंद जयंती, व स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ जयंती.

फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! - देव हिरे. ( कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर, संचालित नूतन माध्यमिक...

read more
रेल्वे ओव्हर ब्रीज शेजारी एक नवीन फ्लाय ओव्हर ब्रीज बनवा मनमाड रेल्वे कारखान्याच्या शिष्टमंडळातर्फे आ. कांदे यांना निवेदन

रेल्वे ओव्हर ब्रीज शेजारी एक नवीन फ्लाय ओव्हर ब्रीज बनवा मनमाड रेल्वे कारखान्याच्या शिष्टमंडळातर्फे आ. कांदे यांना निवेदन

नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांची ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन...

read more
एकनाथ महाराज धार्मिक , सांस्कृतिक आणि अध्यात्मिक असे संपन्न व्यक्तिमत्त्व – हभप सदगीर महाराज

एकनाथ महाराज धार्मिक , सांस्कृतिक आणि अध्यात्मिक असे संपन्न व्यक्तिमत्त्व – हभप सदगीर महाराज

  मनमाड : (योगेश म्हस्के) येथे आयोजित करण्यात आलेल्या संस्कृती संवर्धन समिती आयोजित स्वामी...

read more
आत्मनिर्भर आणि विकसित भारताचं उद्दिष्ट २०४७ पर्यंत साध्य करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा ही एक चळवळ:- डॉ. भारती पवार

आत्मनिर्भर आणि विकसित भारताचं उद्दिष्ट २०४७ पर्यंत साध्य करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा ही एक चळवळ:- डॉ. भारती पवार

आज मनमाड मध्ये विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]