मेष – आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी आहे. कुटुंबातील आनंददायी वातावरण पण आपल्या मनाला प्रफुल्लित राहण्यात मदत करेल. घरात सुखद प्रसंग घडतील. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. सामाजिक क्षेत्रात आपणाला यशकीर्ती लाभ होईल.
वृषभ – आज वाद होण्याची शक्यता असल्याने बौद्धिक चर्चेपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मनाला काळजी लागून राहील. पोटाच्या तक्रारीमुळे मन अस्वस्थ राहील.
मिथुन -आज उत्साहाचा अभाव राहील. कुटुंबातील व्यक्तींशी वाद होण्याची शक्यता आहे. स्थावर संपत्तीशी संबंधित व्यक्तींपासून सावध राहावे लागेल. अचानक धन खर्च होईल.
कर्क – शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. गूढ विद्येची आवड निर्माण होईल. दुपार नंतर काही ना काही कारणाने चिंतीत व्हाल. कुटुंबियांशी मतभेद संभवतात.
सिंह – सकाळी आपल्या गोड बोलण्याने इतरांकडून आपली कामे करवून घ्याल. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवू शकाल. दुपार नंतर आप्तेष्टां कडून काही लाभ संभवतो. मित्रांचा सहवास घडेल.
कन्या – आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आपल्या प्रभावी वक्तृत्वाने आपण प्रेमळ व लाभदायी संबंध प्रस्थापित करू शकाल. आपले विचार इतरांना पटवून देऊ शकाल. व्यवसायात फायदा होईल. मन आनंदित राहील. आर्थिक लाभ संभवतो.
तूळ – शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे मित्रांशी वाद होण्याची शक्यता आहे. कोर्ट – कचेरी पासून शक्यतो दूर राहणे हितावह राहील. दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. मानसिक स्वास्थ्य लाभेल.
वृश्चिक – आज अनेक प्रकारचे लाभ आपणास मिळू शकतील. आपली कीर्ती वाढेल. धनप्राप्ती होईल. मित्रांसाठी पैसे खर्च होतील. त्याच बरोबर त्यांच्यासह फिरण्याचा आनंद लुटू शकाल. दुपार नंतर मात्र, शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल.
धनु – कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील. आरोग्य उत्तम राहील. व्यापार – व्यवसायात लाभ होईल. सरकारी कामातून लाभ होतील. अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल. व्यापारात व प्राप्तीत वृद्धी होईल.
मकर – परदेशस्थ नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी मिळाल्याने आपण आनंदित व्हाल. प्रवास संभवतो. कामा संबंधी एखादी योजना आकार घेईल.
कुंभ – आज आपण जर आपल्या रागावर व वाणीवर संयम ठेवलात तर आजचा दिवस आपण आनंदात घालवू शकाल. कुटुंबियांशी संभाव्य वाद टाळू शकाल. दुपार नंतर मित्रांच्या सहवासात आनंदात वेळ घालवू शकाल. प्रवास संभवतो.
मीन – दैनंदिन कामे शांततेत पूर्ण होतील. मित्रांसह एखाद्या मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी होऊ शकाल. भागीदाराशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित होऊ शकतील. दुपार नंतर मात्र, प्रकृतीत अचानकपणे काही बिघाड होईल.




