Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

शारदीय नवरात्रोत्सव….आज तिसरी माळ

Sep 28, 2022

मनमाड : (योगेश म्हस्के )आज शारदीय नवरात्री उत्सवाचा आज तिसरा दिवस , शहरातील अनेक देवी मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे.

आज आपण आय.यु.डी.पी. परिसरातील भवानी चौक येथील भवानी टेंट हाऊस अँड डेकोरेटर्सचे संचालक श्री पंदरकर परिवार यांच्या येथील श्री तुळजाभवानी माता मंदिर पाहुया. श्री पंदरकर परिवार यांनी आपल्या घरालाच सुंदर अशा मंदिराचे रूप दिले आहे. मंदिरा संबंधित माहिती देतांना पंदरकर परिवाराचे सदस्य श्री गोरख पंदरकर यांनी सांगितले की साधारण एकवीस वर्षांपुर्वी त्यांनी आपल्या घराचे काम करत असताना त्यांना जमीनी मध्ये एक देवीच्या आकाराची शिळा सापडली होती ,त्यांनी त्या शिळेची आपल्या घराजवळच स्थापना करून त्याची सेवा करण्यात सुरवात केली. काही दिवसांनी त्याच शिळेला मुर्तीकाराकडुन सुंदर अशा कुलस्वामीनी तुळजाभवानी मातेचे स्वरूप देण्यात आले आहे. काही वर्षांपुर्वी श्री पंदरकर परिवाराने आपल्या घरालाच मंदिराचे रूप देऊन सुंदर असे मंदिर बनवुन त्या मंदिरात श्री तुळजाभवानी मातेची स्थापना केली आहे.

यंदाचा नवरात्रीच्या काळामध्ये मंदिराला आकर्षक अशी विद्युतरोषणाई करून आकर्षक सजावट करण्यात आली आहे.पहाटे पाच वाजेपासुनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते , मंदिराला केलेली आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावट शहरातील भाविकांचे लक्ष वेधुन घेत आहे.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुक्यातील पहिल्या खाजगी कृषी बाजार समितीचा परवाना सानप कृषी खाजगी बाजार समितीला प्रदान

नांदगाव तालुक्यातील पहिल्या खाजगी कृषी बाजार समितीचा परवाना सानप कृषी खाजगी बाजार समितीला प्रदान

नांदगाव सोमनाथ घोंगाणे महाराष्ट्र राज्य पणन संचलनालयाच्या वतीने पोखरी ता.नांदगाव जि. नाशिक येथे...

read more
निलमणी ट्रस्ट ची गणेशोत्सवाची परंपरा गौरवास्पद – मनमाड शहर पोलीस ठाण्यातर्फे गौरव

निलमणी ट्रस्ट ची गणेशोत्सवाची परंपरा गौरवास्पद – मनमाड शहर पोलीस ठाण्यातर्फे गौरव

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]