Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सर्वोच्च न्यायालयाचा गर्भपात संदर्भात महत्वपूर्ण निकाल

Sep 29, 2022

भारतात आता अविवाहित महिलांनाही MTP कायद्यानुसार गर्भपात करण्याचा अधिकार आहे. आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अविवाहित महिलांना 24 आठवड्यांच्या आता गर्भपात करण्याचा अधिकार मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नंसी कायद्याच्या (MTP) नियमात 3-B चा विस्तार केला आहे. आतापर्यंत 20 आठवड्याहून अधिक आणि 24 आठवड्यांआधी गर्भपात करण्याचा अधिकार फक्त विवाहित महिलांना होता. आता हा नियम अविवाहित महिलांनाही लागू होणार आहे.

सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात म्हटले आहे की, “कलम 21 अंतर्गत प्रजनन स्वातंत्र्य, सन्मान आणि गोपनीयतेचा अधिकार अविवाहित स्त्रीला विवाहित स्त्रीप्रमाणेच आहे. 20-24 आठवड्यांच्या दरम्यान गर्भधारणा असलेल्या एकल किंवा अविवाहित गर्भवती महिलांना गर्भपात करण्यास मनाई करणे, तर अशा परिस्थितीत विवाहित महिलांना गर्भपात करण्याची परवानगी देणे हे घटनेच्या कलम 14 च्या भावनेचे उल्लंघन होईल.”

महिला विवाहित असो वा अविवाहित, तिला MTP कायद्यांतर्गत गर्भधारणेच्या 24 आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्याचा अधिकार आहे. न्यायालयाने सांगितले की, गर्भपाताचा उद्देश स्थापित करण्यासाठी बलात्कारामध्ये वैवाहिक बलात्काराचाही समावेश होतो.

अजून बातम्या वाचा..

के आर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये क्रांतिवीर वसंतराव नाईक यांची पुण्यतिथी साजरी

के आर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये क्रांतिवीर वसंतराव नाईक यांची पुण्यतिथी साजरी

के आर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये क्रांतिवीर वसंतराव नाईक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली....

read more
मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या कु कृष्णा पानसरे याची यवतमाळ येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड

मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या कु कृष्णा पानसरे याची यवतमाळ येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]