सोमवार दिनांक 03/10/2022 रोजी दसरा सणानिमित्त कृषि उत्पन्न बाजार समिती मनमाड मध्ये झेंडू फुलांचा लिलाव शुभारंभ करण्यात आला. 03/10/2022 व 04/10/2022 या दोन दिवस बाजार समिती मध्ये झेंडू फुलांचा लिलाव होणार आहे. बाजार समितीचे प्रशासक श्री. चंद्रकांत विघ्ने साहेब यांचे मार्गदर्शनाखाली झेंडू फुले लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. बाजार समिती मधील व्यापारी प्रकशशेठ बढे, विलासशेठ चौधरी व बाजार समितीचे सचिव विश्वास राठोड यांनी लिलावाचा शुभारंभ केला व बाजार समितीच्या सर्व कर्मचारी वर्गाचा नियंत्रणाखाली लिलाव प्रक्रिया सुरळीत पार पडली. तसेच लिलाव प्रक्रिया सुरळीत सुरू रहावी यासाठी मनमाड शहर पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी देखील बाजार समिती मध्ये उपस्थित होते. त्यानुसार सोमवार दिनांक 03/10/2022 रोजी झेंडू फुलास प्रती क्विंटल 1850 ते 6450 सरासरी 5000 इतका भाव मिळाला.

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड
मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...