loader image
[ays_poll id=7]

महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात पार पडलेल्या कबड्डी स्पर्धेत मनमाड बॉईज संघाला विजेतेपद

Oct 4, 2022

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे संस्थेच्या ७० वा वर्धापन दिनानिमित्त नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन मान्यतेने एक दिवसीय मनमाड शहर पातळीवरील पुरुष खुला गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात मनमाड बॉईज संघाने प्रथम पारितोषिक मिळवून विजेतेपद पटकावले. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक न्यू अशोक संघाने, तृतीय पारितोषिक एस. एन. जे. बी चांदवड संघाने तर चतुर्थ पारितोषिक नवयुवक क्रीडा मंडळाने पटकावले.

अष्टपैलू खेळाडू म्हणून एस. एन.जे बी संघाचा भूषण ठाकरे, उत्कृष्ट चढाई साठी मनमाड बॉईज संघाचा तेजस भडके, उत्कृष्ट पकडसाठी न्यू अशोक संघाचा सतीश केदारे या खेळाडूला, तर भूषण ठाकरे याची उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. या खेळाडूंना बक्षीस वितरण सोहळ्यात पारितोषिक देऊन त्यांचा गौरव केला.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण पाटील यांनी बक्षीस वितरण समारंभात आपल्या मनोगतातून सर्व खेळाडूंना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश गांगुर्डे, प्रास्ताविक डॉ.पवनसिंग परदेशी, तर आभार प्रा. दिलीप कातकडे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. एन. डी. पगार, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ प्रमोद आंबेकर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य ज्योती पालवे, वोकेशनल विभागाचे उपप्राचार्य पी.के. बच्छाव, शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा.रोहित शिंदे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री विठ्ठल फंड, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, व विद्यार्थी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.