loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ०५ ऑक्टोबर २०२२ – बुधवार

Oct 5, 2022


मेष: आज आपण एखाद्या अडचणीत सापडू शकता. नोकरीत इतरांशी प्रेमाने वागून कार्य पूर्ण करून घ्या. वाद संभवतात. नशिबाची साथ मिळणार नाही. कामात त्वरित यश मिळणार नाही. दुपार नंतर परिस्थितीत सुधारणा होईल.

वृषभ – आज आपण हळवे व्हाल व त्यामुळे आपणास बेचैनी जाणवेल. शारीरिक स्वास्थ्यावर सुद्धा त्याचा नकारात्मक परिणाम होईल. नवे कार्य आज सुरू करू नका. उक्ती व कृतीवर नियंत्रण ठेवा. खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या. व्यवसायात विघ्ने येतील.

मिथुन – आजचा दिवस आनंददायी आहे. आज आपली मनःस्थिती मनोरंजनात्मक कार्यात सहभागी होण्याची असल्याने मित्रांसह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. रुचकर भोजन व उंची वस्त्रालंकार लाभतील. दुपार नंतर आपण जास्त हळवे व्हाल व त्यामुळे मनातील दुःख वाढेल.

कर्क – आज व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील. स्त्रियांना माहेरहून आनंददायी बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील.

सिंह – आजचा दिवस प्रणयाराधनेसाठी अनुकूल आहे. रागावर नियंत्रण ठेवा. पोटाच्या व्याधी त्रास देतील. दुपार नंतर घरात आनंद- उत्साहाचे वातावरण राहील. मानसिक प्रसन्नता व उत्साह जाणवेल.

कन्या – आज शारीरिक स्वास्थ्य, मानसिक तरतरी व चेतना शक्तीचा अभाव राहील. सामाजिक स्तरावर मानहानी संभवते. धनहानी सुद्धा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा.

तूळ – आजचा दिवस नवे कार्य हाती घेण्यास अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीच्या भेटीने आनंद होईल. भाग्योदय होईल. समाजात मान- सन्मान मिळतील. दुपार नंतर मात्र मन उदास होईल. शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. घरातील वातावरण क्लेशकारक राहील.

वृश्चिक – नियोजित काम पूर्ण न झाल्याने नैराश्य येईल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे आज टाळावे. घरगुती वातावरण क्लेशदायी राहील. दुपार नंतर भावंडांसह आनंदात वेळ घालवाल. प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल.

धनु – नियोजित कामे पूर्ण होऊन धनप्राप्ती होईल. शारीरिक व मानसिक दृष्टया उत्साहित व ताजेतवाने राहाल. प्रत्येक काम उत्साहाने कराल. प्रवास संभवतो. दुपार नंतर मात्र द्विधा मनःस्थिती होईल.

मकर – आज आपल्या बोलण्या वागण्याने भांडण होण्याची शक्यता असल्याने त्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. संतापाचे प्रमाण वाढेल. मन चिंतीत राहील. मनःशांती मिळविण्याचा प्रयत्न करा. दुपार नंतर स्फूर्ती व उत्साह वाढेल.

कुंभ – सामाजिक क्षेत्रात आपण सक्रीय राहाल व त्याच्या फल स्वरूप आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकल्याने त्यांच्या आनंदात भर पडेल. दुपार नंतर मात्र घरातील वातावरण कलुषित होईल.

मीन – हातून परोपकारी कार्य घडेल. व्यापारात सुयोग्य नियोजनामुळे व्यापार वृद्धी करू शकाल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामाचे कौतुक करतील. व्यापारासाठी प्रवास करावा लागेल.


अजून बातम्या वाचा..

.