मनमाड शहरातील गुरुद्वारात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली. गुरुजीत सिंग कांत वय ७१ यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. ४ ऑक्टोंबर रोजी १० वाजे पूर्वी हा प्रकार लक्षात आला. मनमाड गुरुद्वराचा लंगर हॉल वरील गच्चीवर मोकळ्या जागेत एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला.वय अंदाजे २० ते २५ वर्षे, अंगात काळे निळे पट्टे असलेला शर्ट निळ्या रंगाची काळे निळे पट्टे असलेली पँट परिधान केलेली आहे. ह्या इसमाबद्दल कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. पोलिस नाईक एस.के.धुमाळ पुढील तपास करीत आहेत.
राशी भविष्य : ०७ ऑक्टोबर २०२५ – मंगळवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....












