loader image

बघा व्हिडिओ – मुंबई लोकलमध्ये महिलांची फ्री स्टाईल हाणामारी, महिला पोलिस जखमी

Oct 7, 2022


मुंबई लोकलमध्ये मारहाणीच्या घटना सातत्याने घडत असून रोज अगदी क्षुल्लक कारणांवरुन बाचाबाची, मारहाण असे प्रकार घडत असतात. सीटवर बसण्यावरुन तर नेहमीच मारहाणीच्या घटना घडत असतात. असाच एक प्रकार ट्रान्स हार्बर लाईनवर ठाणे-पनवेल दरम्यान घडला आहे.

रेल्वे लोकलमध्ये सीटवर बसण्यावरून तीन महिलांमध्ये झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर तुंबळ, फ्री स्टाईल हाणामारीमध्ये झाले. यावेळी भांडण सोडविण्यास गेलेल्या रेल्वे महिला पोलीस कर्मचाऱ्याला सुध्दा आरोपी महिलेनं मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला असून यात मारहाणीचा भीषण प्रकार दिसून येत आहे.

ठाण्याकडून पनवेलला जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवासी महिलांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी

आज्जू तोवित खान असं मारहाण करणाऱ्या आरोपी महिलेचं नाव आहे. दसऱ्याच्या दिवशीचा हा व्हिडीओ आहे. दसऱ्या दिवशी संध्याकाळी ठाण्याकडून पनवेलला जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवासी महिलांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. लोकलमधील बसण्याचे आसनावरून तीन महिलांमध्ये बाचाबाचीने सुरुवात झाली.

 

ठाण्यावरून बसलेल्या आज्जू तोवित खान आणि गुळनाथ जुबेरखान यांनी स्नेहा देवडे या महिलेशी सीटवरून वाद सुरू केला. त्यानंतर या शाब्दिक वादाचे रूपांतर तुफान मारामारीत झाले. या लोकलमध्ये नेरूळ स्थानकातून महिला पोलीस कर्मचारी शारदा उगले भांडण सोडवण्यासाठी चढल्या.

मात्र यावेळी मारामारी करणाऱ्या आरोपी आज्जू तोवित खान हिने महिला पोलिसाला सुध्दा मारहाण केली. यात त्यांच्या डोक्याला लागून त्या देखील रक्तबंबाळ झाल्या. स्नेहा देवडे या देखील या मारहाणीत जखमी झाल्या आहेत.

 

यामध्ये डोक्याला इजा होवून जखमी झालेल्या महिला पोलीस कर्मचारी शारदा उगले यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकणी महिला आरोपी आज्जू खान आणि गुळनाथ जुबेरखान या दोघींवर वाशी रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान महिला आरोपी आज्जू खान हिच्यावर चोरीचा गुन्हा या आधी दाखल आहे.

या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला असून व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होत आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.