loader image
[ays_poll id=7]

घाटमाथ्यावर बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वैद्यकीय अधिकार्यांची बघ्याची भुमिका

Oct 8, 2022


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील आठ गावे व तांडे वाड्यावस्त्यांवर ठिकठिकाणी बोगस बंगाली डॉक्टरांनी कुठल्याही प्रकारची शैक्षणिक पात्रता नसतांना आपला वैद्यकीय व्यवसाय सुरु केल्याचे दिसून येत असून बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आणि जातेगांव येथील प्राथमिक आरोग्य उप केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी आणि कर्मचारी तसेच प्रत्येक गावात स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या आशा सेविका यांना व पोलीस विभागास सर्व कल्पना असतांना देखील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळणाऱ्या या बोगस डॉक्टरांवर प्रशासन का कार्यवाही करत नाही, याबाबत चर्चेला उधाण आले आहे.
या विषयी आरोग्य विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना विचारले असता त्यांनी आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, आम्हाला अशा बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचा अधिकार नसून त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, पोलीस निरीक्षक इत्यादी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमलेली असते.
व त्या समितीला आम्ही वेळोवेळी कोणकोणत्या गावात बोगस वैद्यकीय व्यवसाय करणारे बंगाली व इतर स्वतःला डॉक्टर म्हणून घेणाऱ्या बाबत तोंडी व लेखी पत्र पाठविले आहे. मात्र वरिष्ठ पातळीवरुन कारवाई करण्यात येत नाही, व वरिष्ठांना आम्हाला विचारण्याचा अधिकार नाही असे सांगितले.
वैद्यकीय व्यवसायाशी निगडीत असलेल्या संघटनेने व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालूका प्रमुख प्रदीप थोरात यांनी मागील काही महिण्यांपुर्वी अशा बोगस डॉक्टरांवर कार्यवाही करण्यात यावी यासाठी मे.जिल्हा अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, तहसीलदार यांना निवेदने देउन तसेच तहसील कार्यालयाच्या समोर नांदगाव येथे उपोषण देखील केले. मात्र शासनाच्या वतीने बोगस डॉक्टरांवर कार्यवाही करण्याचे दुरच राहिले व त्या उपोषणाला बसलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले की, अशा डॉक्टरांवर कार्यवाही करण्यासाठी एखाद्या रुग्णांने त्या डॉक्टर कडे काही उपचार घेतल्याचा पुरावा पाहिजे, तसेच बोगस वैद्यकीय व्यवसाय सुरु असल्या बाबत त्यांच्या दवाखान्याचे फोटो, व्हिडीओ आणि अर्ज सादर केला पाहिजे. त्यानंतर आमच्याकडून त्यांच्यावर धाड टाकून कार्यवाही कार्यवाही करण्यात येईल असे उत्तर देन्यात आले.
शासनाच्या वतीने नगरिकांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी म्हणून प्रत्येक गावात आशा सेविकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांच्या मार्फत अशा बोगस डॉक्टरां बाबत स्थानिक वैद्यकीय अधिकारी माहिती घेऊन कार्यवाही करु शकतात, मात्र आरोग्य विभागच शासनाचे नियम कशासाठी कोणाला खुश करण्यासाठी पायदळी तुडवत आहे हे लक्षात येत नाही. त्यामुळे मात्र नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून चर्चेचा विषय झाला आहे.


अजून बातम्या वाचा..

बांबूच्या काड्यांतून साकारला कष्टाचा आणि कौशल्याचा धडा – संस्कारखेळवाडीत कुटीरउद्योगाचे जिवंत प्रात्यक्षिक

बांबूच्या काड्यांतून साकारला कष्टाचा आणि कौशल्याचा धडा – संस्कारखेळवाडीत कुटीरउद्योगाचे जिवंत प्रात्यक्षिक

ग्रामीण जीवनातील स्वयंपूर्णतेची परंपरा आणि पारंपरिक कुटीरउद्योगाची ओळख बालकांना व्हावी, या...

read more
फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी

फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी

फ्रान्समधील ग्रेनोबलनजीक सेंट हिलारे येथे पार पडलेल्या ५३ व्या 'कुपेकार २०२६' या आंतरराष्ट्रीय...

read more
नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास केंद्राची मंजुरी – नांदगाव तालुक्याच्या पदरी निराशाच

नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास केंद्राची मंजुरी – नांदगाव तालुक्याच्या पदरी निराशाच

नाशिक आणि जळगाव या दोन जिल्ह्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशा नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला केंद्र...

read more
आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

मनमाड शहरात मोठ्याप्रमाणावर रोजंदारीवर काम करणारे नागरिक असून परिवारातील एखाद्या सदस्यांचे निधन...

read more
विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

शाळा सोडल्यानंतर किंवा शिक्षण पूर्ण झाल्यावर शाळेच्या दाखल्यावर जन्मतारीख, स्वतःचे नाव, वडिलांचे...

read more
.