loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १० ऑक्टोबर २०२२ – सोमवार

Oct 10, 2022


मेष: आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आपली सर्व कामे सहजपणे पूर्ण होतील. त्यामुळे आपला उत्साह वाढेल. एखादा आर्थिक लाभ संभवतो. कुटुंबियांसह आनंदात वेळ जाईल. मातृ घराण्या कडून फायदा होईल.

वृषभ: आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. आपले मन वेगवेगळ्या चिंतांनी ग्रस्त असेल. स्वास्थ्य बिघडेल किंवा डोळ्याचे विकार संभवतात. कुटुंबीय किंवा आप्तजन यांचा विरोध राहील. आज सुरू केलेली सर्व कामे अपूर्ण राहतील.

मिथुन: आज आपले प्रत्येक काम सुरळितपणे पार पडेल. घर, कार्यालय व सार्वजनिक ठिकाणी अनुकूल वातावरण राहिल्याने मनास प्रसन्न वाटेल. मान – सन्मान वाढतील. वरिष्ठांच्या सहकार्यामुळे आपल्या प्रगतीचा मार्ग रुंदावेल.

कर्क: आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्या बरोबरच भाग्योदयाची संधी आपली प्रसन्नता वाढवेल. परदेशातून सुखद बातम्या येतील. मंगल कार्य, प्रवास ह्यामुळे आपल्या आनंदात भर पडेल. कुटुंबियांसह चांगल्या प्रकारे वेळ जाईल.

सिंह: आज आपल्या प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आजारपणामुळे दवाखान्याचा खर्च वाढेल. राग व बोलणे ह्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबियांशी मतभेद होतील. बाहेरच्या खाण्या – पिण्यामुळे प्रकृती बिघडेल.

कन्या: आज सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत लाभाबरोबरच प्रसिद्धी सुद्धा मिळेल. स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल. दांपत्य जीवनात परमोच्च सुखाचे क्षण अनुभवाल. नव्या वस्त्रालंकाराची खरेदी करून ते वापरण्याची संधी मिळेल.

तूळ: आजचा दिवस अत्यंत लाभदायी आहे. नोकरीत यश मिळेल. घरातील वातावरण सुखद राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. कामाच्या ठिकाणी सहकारी चांगले सहकार्य करतील. मातुल घराण्याकडून चांगल्या बातम्या मिळतील.

वृश्चिक: आज आपल्या घरगुती जीवनात शांतीचे व आनंदाचे वातावरण राहील. तसेच आरोग्य उत्तम राहील. आजारी माणसाच्या प्रकृतीत सुधारणा होईल. कार्यालयात सहकारी लोकांचे सहकार्य पूर्णपणे मिळेल. मैत्रिणी भेटतील.

धनु: आज आपणात शारीरिक व मानसिक स्फूर्ती व उत्साह ह्यांचा अभाव राहील. कुटुंबात क्लेश व कलहजन्य वातावरण राहिल्याने मनात उदासीनता राहील. निद्रानाशाचा त्रास होईल. सार्वजनिक जीवनात अपमान होण्याचे प्रसंग येतील.


अजून बातम्या वाचा..

.