loader image
[ays_poll id=7]

निवडणूक आयोगाकडे शिंदे गटाकडून तीन नावांचा पर्याय सादर

Oct 10, 2022

शिंदे गटाने पक्षासाठी निवडणूक आयोगाकडे तीन नावांचा पर्याय सादर केला आहे. शिंदे गटाने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या तिन्ही नावांमध्ये बाळासाहेब यांचा उल्लेख असून यापुढे निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिवसेना हे मुख्य नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर पर्यायी नावांचा प्रस्ताव सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाने आज दुपारी एक वाजेपर्यंतची मुदत ठाकरे आणि शिंदे गटाला दिली होती.

निवडणूक आयोगाला शिंदे गटाने सादर केलेल्या नावांमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना बाळासाहेबांची असे तीन पर्याय देण्यात आले आहेत. यापैकी शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावाचा प्रस्ताव ठाकरे गटानेदेखील दिला आहे. त्यामुळे शिवसेना-बाळासाहेब ठाकरे हे नाव निवडणूक आयोग रद्द करण्याची अधिक शक्यता आहे. शिंदे गटाने बंड केल्यानंतर आम्हीच खरी शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना असल्याचा दावा करण्यात येत होता. त्याचे प्रतिबिंब शिंदे गटाने दिलेल्या नावाच्या पर्यायात दिसून आले आहे. आता, निवडणूक आयोग कोणता निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

अजून बातम्या वाचा..

मालेगावातील अल्पवयीन मुलीच्या हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालणार – पालकमंत्री दादा भुसे यांनी केली होती मागणी

मालेगावातील अल्पवयीन मुलीच्या हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालणार – पालकमंत्री दादा भुसे यांनी केली होती मागणी

मनमाड : मालेगाव तालुक्यातील अजंग येथे (दि. १४ मे) रोजी अल्पवयीन मुलगी भाविका (रिया) ज्ञानेश्वर...

read more
बघा व्हिडिओ : नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ – मनमाड शहरात भाजपा – शिवसेना – आर पी आय महायुती तर्फे विजय आनंद जल्लोष कार्यक्रम संपन्न

बघा व्हिडिओ : नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ – मनमाड शहरात भाजपा – शिवसेना – आर पी आय महायुती तर्फे विजय आनंद जल्लोष कार्यक्रम संपन्न

मनमाड - 19 व्या लोकसभेत भाजपा चे व एन डी ए चे सर्वोच्च शक्तिशाली नेते नरेंद्र मोदी यांच्या...

read more
मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मनमाड विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम विद्यालयाचा निकाल सन २०२३-२४ मध्ये ९२.९८% लागला.

मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मनमाड विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम विद्यालयाचा निकाल सन २०२३-२४ मध्ये ९२.९८% लागला.

  मनमाड, मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीचा परीक्षेचा निकाल...

read more
.