loader image
[ays_poll id=7]

नांदगाव शहरातील एच. आर. हायस्कूलमध्ये  ईद मिलादुन्नबी हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकत्र साजरी केली

Oct 10, 2022

सोमनाथ घोंगाणे

हिदूं मुस्लीम बांधवा कडून आज शहरातील प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली. घोड्यावर चांद असलेला हिरवा झेंडा घेऊन बसलेला स्वार, धार्मिक घोषणा देणारे शिस्तप्रिय भाविक मिरवणुकीचे आकर्षण ठरले.
मिरवणुकीची सुरुवात मौलाना सैफुतुल्ला आणि मौलाना मसूद इल्मी यांनी केली. मिरवणूक मार्गावर राष्ट्र पुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालण्यात आले.
देशात इतरत्र धार्मिक तेढ निर्माण झाली तरी येथे त्याला थारा दिला जात नाही असे सांगतांना येथील मुस्लीम समाजाने उच्च शिक्षण घेऊन प्रगती करावी अशा अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या. यात्रेची सुरूवात मौलाना सैफुतुल्ला आणि मौलाना मसूद इल्मी यांनी केली. मशिदीत कुराणखानी (पठाण) करण्यात आले.
शहरातील हिंदू-मुस्लीम एकोपा, भाईचारा तसेच प्रेम, एकमेकांच्या सणांमध्ये सहभाग या गोष्टी आदर्शवत व उदाहरण म्हणून सगळीकडे अनुकरणीय आहेत असे प्रतिपादन वक्त्यांनी केले.मुस्लीम बांधवांनी केलेल्या आदरातिथ्याने सर्व उपस्थित भारावून गेले
यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, संतोष गुप्ता, ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष श्रावण आढाव, सुरजमल संत, रंगनाथ चव्हाण, डॉ सुनील तुसे, जगन्नाथ साळुंके, संजीव धामणे ‘ संजय मोरे ‘ अनील धामणे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सुरवाडकर, पोलीस उपनिरीक्षक मनोज  वाघमारे, जगताप, संजय सानप ,शहरातील पत्रकारांचा आदींचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

 जश्रे ईद-ए-मिलादुनबी इंतेजामिया कमिटीने आयोजन केले होते. अध्यक्ष नासीर खान अलीयार खान, जावेद शेख, माजी नगरसेवक याकुब अब्दल शेख, इक्बाल शेख, अवल सैय्यद, कलीम गफार शेख, शरीफ शेख सम्राट, शाकीर पठाण, एजाज खाटिक, मौसीन खाटिक, जहीर सौदागर, वसीम अजीज शेख, अकिल मास्टर, हाजी फैसल ,उस्मान शेख, आदींनी  आयोजन केले. सूत्रसंचालन इस्माईल शेख यांनी केले.
ईदचे औचित्य साधून मुस्लिम युवकांनी येथील शनि चौक मिरवणुकीचे जोरदार स्वागत करून मिठाई वाटप करण्यात आली. तर येथील मूक-बधिर विद्यालयात विद्याथ्यांना मीठाई वाटप करत सण साजरा करण्यात आला. यावेळी मोसीन इफेदार, मुदस्सर शेख, अनवर शेख, अकलाक टीसी, एजाज मोबाईल, शरीफ गनी, प्रितम कासलीवाल, पप्पु फिटर, शिक्षक ज्ञानेश्वर पाटील, सुधिर नागरे उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

  "मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
.